शाहरूखच्या त्या कृतीने राजकारणही ढवळले आणि सोशल मिडियातही पडसाद!

अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) लतादीदींच्या (Lata Mangeshkar) पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतांना केलेल्या एका कृतीवरून सोशल मीडियावर प्रचंड वाद निर्माण झाला आहे.
Shahrukh Khan
Shahrukh Khan Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी (6 फेब्रुवारी) मुंबईत निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. मुंबईतील शिवाजी पार्क येथे (Shivaji Park) शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra MOdi) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, (Bhagatsingh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती. यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानही होता. मात्र, त्याने लतादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतांना केलेल्या एका कृतीवरून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

Shahrukh Khan
लतादीदींवरील ट्रोलवरुन प्रकाश आंबेडकर संतप्त ; टि्वट करुन झोडपलं

शाहरुखने केलेली कृतीवर तो थुंकल्याचा दावा काहीजण करत आहेत, तर काहींनी तो दुवा मागत असल्याचा दावा केला आहे. या गोष्टीवरून शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलेच सुनावले आहे. एका गटाच्या, परिवारांच्या लोकांना जात, धर्माच्या पलिकडे काही दिसतच नाही. तुम्ही देशाची वाट लावली, अश्या शब्दात त्यांनी ट्रोल करणाऱ्यांवर टीका केली आहे.

Shahrukh Khan
एका फोनवर लतादीदीने दिलेला शब्द पाळला अन् युसूफचा युसूफभाई झाला..

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आले होते. यावेळी शाहरुख सुद्धा त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत आला होता. यावेळी पुजाने हात जोडून तर शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना शेवटचा निरोप दिला. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याचे काहींनी कौतूकही केले. मात्र, त्यानंतर मास्क काढत शाहरुख दीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचा दावा काहींनी केला. यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला असून अनेकांनी शाहरूखवर टीका केली आहे. तर, काहींकडून त्याने दुवा फुंकल्याचे सांगण्यात येत आहे. हा वाद इतका रंगला की, यावर आता राजकीय मंडळींनाही प्रतिक्रिया द्याव्या लागत आहेत.

कोण काय म्हणाले...

याबाबत बोलतांना संजय राऊत म्हणाले की, "ज्या पद्धतीने शाहरूख खानला ट्रोल केल जात आहे. ते तिथे दुवा मागत होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने दुवा मागितला. त्यानंतर काही एका गटाचे एका परिवाराचे लोक व आयटी सेलचे लोक त्यांना ट्रोल करत आहेत. हा काय प्रकार आहे. हा नालायकपणा आहे. बेशरमपणा आहे. तुम्ही इतक्या महान कलाकाराच्या मृत्यूनंतर सुद्धा एका महान कलाकाराला ट्रोल करता त्याची बदनामी करता धर्म, जात द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सुचत नाही तुम्ही देशाची वाट लावली," अश्या शब्दात राऊतांनी ट्रोलर्संना सुनावले आहे.

अमोल मिटकरी आपल्या ट्विटवर म्हणाले, "दुआ पठण" करणे म्हणजे थुंकणे असा नवा जावई शोध लावणाऱ्या लावारिस कारट्याना शाहरुख खान ने "नया है वह" म्हणुन दुर्लक्षित करावे. (टिप :__माझ्या या ट्विटवर सुद्धा काही लावारिस कार्टी ट्रोल करतील ह्याची जाण ठेवून) शेवटी ते लावारिस आहेत हे सिध्द होइल, अशी टीका ट्रोलर्सवर केली आहे.

गोवा भाजप प्रवक्ते प्रशात उमराव आपल्या ट्विटमध्ये म्हटले, थूका हो या फूंका हो हिंदुओं के अंतिम संस्कार में फातिहा पढ़ना, फूंक मारना बदतमीजी हैं, घटिया हरकत हैं, इस्लामिक डोमिनेंस को दिखाना है। क्या मुसलमानों के अंतिम संस्कार में हिन्दू जाकर गंगा जल छिड़कते हैं क्या? महा मृत्युंजय का जाप करते हैं क्या, अश्या शब्दात त्यांनी शाहरूखच्या कृतीचा विरोध केला.

दिग्दर्शक अशोक पंडीत यांनीही ट्विटरवरुन शाहरुखचा दुवा वाचताना फोटो ट्विट करत, “फिरंगी लोक शाहरुखवर सध्या खोटे आरोप करत तो लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीदरम्यान थुंकल्याचा दावा करतायत. अशा लोकांना लाज वाटली पाहिजे. त्याने प्रार्थना करुन पार्थिवावर फुंकर मारली. असं केल्याने पार्थिव सुरक्षित रहावं आणि पुढील प्रवासासाठी त्याच्यासोबत सकारात्मक ऊर्जा राहते, असं मानलं जाते. आपल्या देशामध्ये अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वृत्तीला अजिबात स्थान नाही,” असे म्हटले आहे.

दरम्यान, शाहरूखच्या कृतीवरून अनेकजण आपले मत मांडत आहेत. यामध्ये इस्लामची माहिती असणाऱ्या अनेकांनी हा दावा खोडून काढत शाहरुखने मास्क खाली घेऊन पार्थिवाकडे पाहून फुंकर मारल्याचे म्हटले. एखाद्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना त्याच्या पार्थिवावर फुंकर मारल्यास पार्थिवासोबतच्या नकारात्मक शक्ती दूर लोटल्या जातात असा समज आहे. त्यामुळेच इस्लाम रिवाजानुसार मृत व्यक्तीच्या पार्थिवावर फुंकर मारली जाते, असे म्हटले आहे.

तर, थुंकल्याचा दावा करणाऱ्या अनेकांना इतरांनी थोडी माहिती घ्या आणि मग बडबड करा असा खोचक सल्ला दिला आहे. शाहरुख थुंकला नाही. त्याने नकारात्मक शक्ती नष्ट व्हाव्यात म्हणून त्याच्या धार्मिक मान्यतेनुसार फुंकर मारली. माझ्याप्रमाणे लोकांनाही थोडं वाचले तर त्यांना हे समजेल, असे एकाने म्हटले आहे.

Shahrukh Khan
लतादिदींच्या अंत्यदर्शनाला काँग्रेसचे नेते का नव्हते? पटोलेंनी सांगितले कारण...

एकीकडे शाहरुख थुंकल्याचा दावा केला जात असतानाच दुसरीकडे शाहरुख आणि पूजा दादलानी यांचा अंत्यसंस्कारावेळच्या फोटोवरून अनेकांनी यामधून खरा भारत दिसून येतोय, असे कौतूकही केले आहे. तर, अनेकांनी हा फोटो आपल्या सोशल माध्यमांवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख दुवा मागतोय तर बाजूला उभी असणारी पूजा हात जोडून पाया पडताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com