शिवभोजन थाळी म्हणजे सेनेचे नेते, कार्यकर्ते यांच्या उत्पन्नाचे साधन

भाजपनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले आहे.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray

Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : उदया सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच भाजपकडून (BJP) महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) घेरण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवभोजन थाळी योजनेत (Shivbhojan Thali Yojana) ठाकरे सरकारने घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे सरकारच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शिवभोजन थाळी योजनेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने शिवसेनेकडून (Shivsena) यावर काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis, Uddhav Thackeray</p></div>
शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकरांचा जावईशोध

फडणवीस ट्विटमध्ये म्हणाले, "शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शिवभोजन योजना. महाराजांच्या नावे योजना आणि त्यात भ्रष्टाचार. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान" असे शब्दात शिवसेना व ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये "मुख्यमंत्र्यांना लवकर बरे होण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच. पण गेल्या 2 वर्षांपासून राज्यात सरकारचे अस्तित्व आहे तरी कुठे? असा टोला देखील लगावला आहे.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis, Uddhav Thackeray</p></div>
तुम्ही ५० खासदारांना निलंबित करा पण...राऊतांचे मोदी सरकारला आव्हान!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, "ग्राहकांचा फोटो एकच पण नावे वेगवेगळी टाकून शिवभोजन थाळी योजनेतील अनुदान दलालांनी लाटलीये यातून सरकारने आपल्या बगलबच्चांची सोय केलीय आणि लहानग्यांना उपाशी ठेवण्याचे पाप केलंय गरीबांच्या हक्काचे भोजन दलालांच्या घशात कसं गेलं, याची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत सखोल चौकशी व्हावी," अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

अधिवेशनाला उद्या (ता.22 डिसेंबर) मुंबईत सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि चहापानाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहतील. मात्र, विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com