माजी राज्यमंत्र्यांच्या एका म्हणण्यावर वडेट्टीवारांनी दिले पंचनाम्याचे आदेश !

सोयाबीन हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे सोयाबीन हब म्हणून जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. परंतु 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये सोंगुण टाकलेली सोयाबीन, शेतात लावलेल्या सुड्याच्या गंज्या व शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले.
Vijay Vadettiwar - Subhash Thakre
Vijay Vadettiwar - Subhash Thakre
Published on
Updated on

मंगरूळपीर (जि.वाशीम) : जिल्ह्यात ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना जिल्ह्यातील विदारक परिस्थिती मांडून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतींचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली होती. याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

सोयाबीन हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे सोयाबीन हब म्हणून जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. परंतु 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये सोंगुण टाकलेली सोयाबीन, शेतात  लावलेल्या सुड्याच्या गंज्या व शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  याबाबत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी जिल्ह्यातील विदारक स्थितीची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे मांडून नुकसान ग्रस्त शेतातील पिकांचे सर्वेक्षण तथा पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  दखल घेत तातडीने  पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.यामुळे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(Edited By : Atul Mehere)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com