Anil Deshmukh with Rashtrasant Family
Anil Deshmukh with Rashtrasant Family

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर लवकरच येणार वेबसिरीज...

अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेऊन या वेबसिरीजसाठी लागणाऱ्या खर्चाला मंजुरी मिळण्यासाठी मागणी केली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी ठरावे यासाठी त्यांच्या आयुष्यावर वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या वेबसिरीजसाठी निधीची मागणी केली. ती मागणी अजित पवार यांनी मान्य केली असून लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेबसिरीज येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
 
या शिष्टमंडळात आचार्य वेरुळकर गुरुजी, भाष्कराव विघे, गुहाडे महाराज, अरविंद काळमेघ, डॉ. नरेंद्र तरार, रवी डावले, रामेश्वर बघरट, राजदत्त मायालु यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. श्री संत तुकडोजी महाराज प्रचार व प्रक्षिशण संस्था, दासटेकडी, गुरुकुंज मोझरी जि. अमरावती ही संस्था गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रसंतांवर एखादा चित्रपट व्हावा जेणेकरून त्यांचे विचार हे नवीन पिढीला कळावे, यासाठी प्रयत्न करीत आहे. विदर्भातील जवळपास ३६ आमदार तसेच खासदारांनी या मागणीची पत्रे राज्य शासनाला सादर केली आहेत. 

या संदर्भात सुरुवातीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती व प्रसारण विभागाचे संचालक श्री आंबेकर व त्यांच्या सहकार्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत आज चित्रपटापेक्षा वेबसिरीजला जास्त प्रतिसाद असल्याने ती तयार करण्यात यावी, यावर सविस्तर चर्चा झाली. ज्या नवीन पिढीपर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचावे ती आज मोबाईल, लॅपटॉपवर जास्त असते. त्यामुळे चित्रपटापेक्षा वेबसिरीजला जास्त प्रतिसाद मिळेल, असा सुर या बैठकीतून आला. त्यामुळे वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यानंतर अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेऊन या वेबसिरीजसाठी लागणाऱ्या खर्चाला मंजुरी मिळण्यासाठी मागणी केली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com