

अहमदाबाद : विजय रुपानी (Vijay Rupani) यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गुजराचे ते 30 वे मुख्यमंत्री होते. त्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. पण गुजरातमध्ये हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. मागील 60 वर्षात केवळ तीन मुख्यमंत्री वगळता एकाही मुख्यमंत्र्यांना पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ मिळालेला नाही. त्यापैकी दोन मुख्यमंत्री काँग्रेसचे आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. (Only three Chief Ministers got five years out of 60 years in Gujrat)
गुजरातमध्ये सुरूवातीला काँग्रेसचे वर्चस्व होतं. पाच ते सहा वर्षांचा कालावधी सोडल्यास गुजरातमध्ये 1995 पर्यंत काँग्रेसचीच सत्ता राहिले आहे. पण त्यानंतर आजपर्यंत पुन्हा कधीच काँग्रेसला सत्ता मिळालेली नाही. 1995 पासून दोन वर्ष वगळता आतापर्यंत भाजपने सत्ता टिकवली आहे. पण गुजरातने मागील 60 वर्षात 30 मुख्यमंत्री पाहिले आहेत. आता लवकरच 31 वे मुख्यमंत्री मिळतील.
तीस मुख्यमंत्र्यामध्ये सर्वाधिक 13 वर्ष नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री वगळता एकाही मुख्यमंत्र्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ मिळालेला नाही. मोदी हे 7 ऑक्टोबर 2001 पासून 22 मे 2014 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते पंतप्रधानपदी विराजमान झाले. काँग्रेसचे हितेंद्र देसाई हे 20 सप्टेंबर 1965 ते 12 मे 1971 या कालावधीत मुख्यमंत्री होते.
देसाई यांच्यानंतर माधव सिंग सोळंकी यांना पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला. ते सुरूवातील 24 डिसेंबर 1976 ते 10 एप्रिल 1977 या कालावधीत मुख्यमंत्री होते. त्यानंतर पुन्हा त्यांना 1980 मध्ये मुख्यमंत्री पद मिळाले. यावेळी त्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. सोळंच्या यांच्यानंतर अमरसिंह चौधरी हे चार वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर पुन्हा सोळंकी यांना एक वर्षासाठी मुख्यमंत्री पद मिळाली.
सोळंकी यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ केवळ मोदींना पूर्ण करता आला आहे. केशुभाई पटेल हे 1998 मध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले. पण ते केवळ सात महिने टिकले. त्यांना पुन्हा 1998 ते 2001 अशी तीन वर्ष ही खुर्ची मिळाली. त्यानंतर गुजरातमध्ये मोदी पर्व सुरू झालं. गुजरातमध्ये त्यांनी सर्वाधिक 13 वर्ष मुख्यमंत्री पद टिकवलं. त्यामुळं गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता ने येणे, हा जणू पायंडाच पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.