निष्ठावंत कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेला आमदार प्रशांत परिचारकांनी दिला खांदा

या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटल्याचे दिसून आले.
MLA Prashant Paricharak paid tribute to his loyal Activist
MLA Prashant Paricharak paid tribute to his loyal Activist
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणात परिचारकांचे नाव आजही आदराने घेतले जाते. (स्व.) सुधाकर परिचारकांच्या (Sudhakar Paricharak) मुशीत अनेक कार्यकर्त्यांची जडणघडण झाली. परिचारकांनी कधीही कार्यकर्त्यांची जात, पात आणि धर्म न पाहता केवळ राजकारणातील तत्वनिष्ठा आणि चारित्र्य या दोनच निकषांवर पारख करुन त्यांना राजकाणात काम करण्याची संधी दिली. त्यांच्या या कसोटीवर अनेक कार्यकर्ते यशस्वीदेखील झाले. त्यापैकीच सुधाकर परिचारकांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरेश आगावणे यांचे शुक्रवारी (ता. 3 सप्टेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याची अंत्ययात्रा निघातच भाजप आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्याच्या अत्यंयात्रेला खांदा दिला. 

आमदार प्रशांत परिचारकांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रती दाखवलेल्या निष्ठेमुळे नेता आणि कार्यकर्त्यांमधील नाते किती घट्ट असतं, हेच या प्रसंगातून  आधोरेखीत झाले आहे.

खर्डी (ता. पंढरपूर) येथील सुरेश आगावणे यांचे शुक्रवारी निधन झाले. सुरेश आगावणे हे श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती म्हणून देखील काम पाहिले आहे. सुरेश आगावणे यांची (स्व.) सुधाकर परिचारक व आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख होती. त्यांनी आपल्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात परिचारकांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच काम केले.

अलीकडेच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पंढरपूरसह परिसरातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. या वेळी आमदार प्रशांत परिचारकांनी तर आपल्या निष्ठवंत कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेत खांदा देवून श्रध्दांजली वाहिली. 

या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटल्याचे दिसून आले. एका सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याच्या अत्यंत यात्रेत नेत्याने खांदा देण्याची बहुधा परिसरातील पहिलाच प्रसंग असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com