शिल्पा राजवर ओरडली.. म्हणाली, ''तुला हे सगळं करण्याची काय गरज होती''

शिल्पा पोलिसासमोर रडली.''राज काय करतो, याबाबत मला माहित नाही.''
Sarkarnama Banner - 2021-07-27T143546.560.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-27T143546.560.jpg
Published on: 
Updated on: 

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रावर अश्लील चित्रपट तयार करणे, त्यांना ओटीटी प्लॅटफाँर्मवर प्रदर्शित करण्याचा आरोप आहे. त्याला मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात शिल्पा शेट्टी हीची पण चैाकशी करण्यात आली. 

या तपासात शिल्पा खूप त्रस्त झाली आहे. राज कुंद्रा सोबत तिचा वाद झाला आहे. ती कुंद्रावर संतप्त झाली. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. जेव्हा गुन्हे शाखेचे पोलिस राज कुंद्रा याला घेऊन तिच्या घरी पोहचले तेव्हा शिल्पा राजवर ओरडली. शिल्पा राजला म्हणाली, ''तुला हे सगळं करण्याची काय गरज होती. ते सगळं कशासाठी केलं.'' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा राजला म्हणाली, ''आयुष्याच्या एका टप्प्यावर यश मिळाल्यानंतर तूला हे करण्याची काय गरज होती.'' हे सांगत असतानाच शिल्पा पोलिसासमोर रडली. पोलिसांनी शिल्पाची सहा तास चैाकशी केली. ''राज काय करतो, याबाबत मला माहित नाही. मला त्यांच्या अँप विषयीही काहीही माहित नाही.''असे शिल्पानं चैाकशीत पोलिसांना सांगितलं. 

न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांचा वकीलांना जामीनासाठी अर्ज केला आहे. राजची चैाकशी पूर्ण झाली असल्यामुळे त्याला जामीन मिळावा, अशी मागणी राजच्या वकीलांनी न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ शकते याचा अंदाज राज कुंद्राला होता. त्यामुळे त्याने मार्च महिन्यात आपला फोन बदलला होता. कारण त्या माध्यमातून डाटा कोणालाही मिळू नये म्हणून त्याने फोन बदलला होता. तो फोन फेकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्या फोनमध्ये या प्रकरणाची महत्वाची माहिती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 
 
राज कुंद्रा (वय 45) याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे.  

Edited by : Mangesh Mahale 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com