अतिवृष्टीत निराधार झालेल्या आजीला राज्यमंत्र्यांनी दिला आधार!

त्यांच्या घराची पोस्ट राज्यमंत्री बच्चू कडू यांना पाठविली अन् मदतीचा हात मागितला.
Sarkarnama Banner - 2021-07-26T115405.977.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-26T115405.977.jpg
Published on: 
Updated on: 

लातूर : आठवड्याभरात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमध्ये औसा तालुक्यातल्या गुळखेडा गावातील सरूबाईं टिके यांचे घर सुद्धा यात कोलमडून गेलं. सरुबाई टीके यांच्या घराची दुरावस्था झाली, ही माहिती मिळताच राज्याचे शालेय राज्यमंत्री बच्चू कडू Bachubu Kaduयांनी सरुबाई टिके Sarubai यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. आज  घर बांधण्यासाठी पायाभरणीला प्रारंभ झाला.

सरुबाई टिके गेल्या अनेक वर्षापासून गुळखेडा गावामध्ये राहात आहेत त्या निराधार आहेत त्यांना सध्या कोणाचाही आधार नाही वीस वर्षांपूर्वी त्यांचे पती यांचे निधन झालं आहे. त्यानंतर मुलाचं अपघातामध्ये निधन झालं. त्यामुळे सरुबाई एकट्या पडल्या कोणाचाही त्यांना आधार नाही ना कोणाचा सहारा नाही, अशा सर्वांना आता प्रहार कडून पक्के घर बांधून दिले जाणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यात अतिवृष्टीमध्ये  सरूबाईंचं घर सुद्धा पत्यासारखं कोलमडून गेल, त्यामुळे या निराधार असलेल्या सरुबाईना आता काय करावं हे समजत नव्हतं. 

मुंबईला वास्तव्य असलेल्या नातवाने त्यांच्या घराची पोस्ट राज्यमंत्री बच्चू कडू यांना पाठविली अन्  मदतीचा हात मागितला. बच्चू कडू यांनी क्षणाचाही विचार न करता लातूर  Latur जिल्हा प्रहार पक्ष प्रमुख राजाभाऊ चौगुले आणि कालिदास माने या दोघांनाही तात्काळ या घटनेची दखल घेण्यास सांगितले. त्यानुसारच लातूर जिल्हा प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले आणि कालिदास माने यांनी सरूबाईंच्या मदतीला गेले. आणि त्यांना पक्के घर बांधून देण्याचा निर्धार केला आहे.   
 

चिखलात जाऊन नुकसानग्रस्तांची पाहणी करताना खासदारांना अश्रू अनावर
अमरावती : मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावती Amravati जिल्ह्यात सुरु आहे, त्यामुळे अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झाल आहे. सध्या नदी नाले तुडुंब भरून वाहता आहेत. तर लोकसभेच कामकाज आटोपून अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा navneet rana थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्यात. पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com