
Dinvishesh: भारताच्या तसेच जगाच्या इतिहासात १३ नोव्हेंबर या दिवशी अनेक महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. ज्यामधमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या "गीतांजली' काव्याला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म, इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात यशवंतराव चव्हाण गृहमंत्री आदी प्रमुख घटनांचा उल्लेख करता येईल. पाहूयात कोणत्या वर्षी कोणती घटना घडली?
1873 ः नामवंत कायदेपंडित, संसदपटू व पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचा जन्म.
1947 - सोव्हिएट युनियनकडून पहिल्या एके-४७ ची निर्मिती
1913 ः गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या "गीतांजली' काव्याला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर.
1917 ः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारी कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचा जन्म.
1966 - इंदिरा गांधी यांच्या मंत्रीमंडळात यशवंतराव चव्हाण यांची केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती
1970 - बांगलादेशच्या गंगा डेल्टा परिसराला भोला चक्रीवादळाचा तडाखा. किमान ५ लाख जण पडले होते मृत्यूमुखी
1984 - आठव्या लोकसभेसाठीची निवडणूक जाहीर
1994 - स्वीडनचा युरोपिय युनियनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय
2000 - शिवसेना नगरसेविका व कुख्यात गुंड अश्विन नाईकची पत्नी नीता नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला. या हल्ल्यात जखमी झालेल्या नीता नाईक यांचे नंतर निधन झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.