Ajit Pawar : बबनदादांच्या अपक्ष लढण्याच्या निर्णयावर अजितदादांनी प्रथमच व्यक्त केली नाराजी

Babandada independent decision Ajit Pawar reaction: मला यंदा कळलंच नाही. संजयमामा मला म्हणाले, मी मागच्या वेळी अपक्ष निवडून आलो आहे. पण, तुमच्यासोबत पाच वर्षे इमाने इतबारे राहिलो की नाही. तुमची सत्ता नसली तरी तुमच्यासोबत कायम राहिलो की नाही. त्यामुळे याही वेळी मी अपक्ष निवडणुकीला उभं राहतो.
Ajit Pawar-Baban shinde
Ajit Pawar-Baban shindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 November : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी चालू निवडणुकीत माढ्यातून मुलाला अपक्ष मैदानात उतरविले आहे. पण तिकिट वाटपावेळी झालेला किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला. मला यंदा कळलंच नाही. बबनदादांना घड्याळ घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी मुलाला अपक्ष निवडणुकीला उभं करण्याचं ठरवलं. अपक्ष कशाला घड्याळाच्या चिन्हावर उभं करा, असंही म्हटलं. पण त्यांनी ऐकलं नाही. कधी कधी माणसं ऐकत नाहीत, जाऊ दे, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना उमेदवारी वाटपाच्या वेळी घडलेला किस्सा आपल्या खास शैलीत सांगितला. मोहोळ आणि माढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत. मोहोळमध्ये यशवंत माने, तर माढ्यात मीनल साठे यांना घड्याळाचे बटण दाबून निवडून देण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार म्हणाले, मला यंदा कळलंच नाही. संजयमामा शिंदे मला म्हणाले, मी मागच्या वेळी अपक्ष निवडून आलो आहे. पण, तुमच्यासोबत पाच वर्षे इमाने इतबारे राहिलो की नाही. तुमची सत्ता नसली तरी तुमच्यासोबत कायम राहिलो की नाही. त्यामुळे याही वेळी मी अपक्ष निवडणुकीला उभं राहतो. त्या वर मी म्हटलं ‘राहा.’ मी त्यांना परवानगी दिली. त्यामुळे करमाळ्यात संजय शिंदेंना मतदान करायचं आहे.

Ajit Pawar-Baban shinde
Ajit Pawar : मी सोशल इंजिनिअरिंग केलंय; सगळ्यांना एका चष्म्यातून बघू नका : अजितदादांचे सूचक विधान

पवार म्हणाले, बबनदादांना म्हटलं, दादा आता तुम्हीपण घ्या घड्याळ. पण ते म्हणाले, ‘नको दादा आता रणजितला उभं करतोय’. मग म्हटलं घ्या ना घड्याळ, त्यावर ते म्हणाले, ‘नको दादा, अपक्ष उभं करतोय.’ मी म्हटलं, ‘अपक्ष कशाला.’ माणूस पक्षाचा असेल तर जास्त काम होतं.

आमदार पक्षाचा असेल तर तो हक्काने आमच्याकडून काम करून घेऊ शकतो. निधीसाठी हट्ट करू शकतो आणि आम्हीही त्यांचे हट्ट पुरवू शकतो. पक्षाला वेगळं महत्व असतं, युतीला महत्व असतं. पण काय आहे कधी कधी माणसं ऐकत नाहीत, जाऊ दे, असे म्हणत त्यांनी बबनदादांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar-Baban shinde
Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या आईंची काय होती इच्छा; मृत्यूच्या सहा महिने आधी काय सांगितले होते?

संजयमामांना परवानगी; बबनदादांवर नाराजी

अजितदादांनी बबनदादांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असली तरी संजयमामा शिंदेंना मात्र अपक्ष निवडणूक लढविण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे मोहोळमध्ये बोलताना संजय शिंदेंना मतदान करण्याचे आवाहन केले. पण बबनदादांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी मतदान करा, असे मात्र त्यांनी म्हटलं नाही. बबनदादांवर नाराजी व्यक्त करणारे अजितदादांनी संजयमामांना अपक्ष लढण्याची परवानी दिली, याची मात्र चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com