Ajit Pawar On Munde Resign : मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत अजितदादांचा धनंजय मुंडेंना सूचक इशारा; म्हणाले, ते तर काय हे बघत नाहीत का’?

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सुद्धा म्हटलेले आहे. आम्ही कोणालाही वाचवणार नाही.
Dhananjay Munde-Ajit Pawar
Dhananjay Munde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik, 16 February : संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी होणाऱ्या आरोपांमुळे नैतिकता दाखवून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा का देत नाहीत, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला, त्यावेळी अजितदादांनी ‘तो प्रश्न तुम्ही धनंजय मुंडे यांनाच विचारा’ असे सांगून मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडेंच्याच कोर्टात ढकला आहे, त्यामुळे आता धनंजय मुंडे काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांच्या देवळाली मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक दौऱ्यावर आलेल्या अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत अत्यंत स्पष्टपणे भाष्य केले.

सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर तुम्ही राजीनामा दिला. आर. आर. पाटील यांनी चुकीचं विधान गेल्यामुळे राजीनामा दिला. विलासराव देशमुख यांनीसुद्धा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. मग हीच नैतिकता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) का दाखवत नाहीत, असा सवाल राज्यभरातून विचारला जात आहे, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी ‘हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा,’ असे उत्तर दिले.

तुमच्या पक्षाचा, आमच्या पक्षाचा असं काही नसतं. काय चाललंय हे ते तर काय बघत नाहीत का. संतोष देशमुख खून प्रकरणात माझा दुरान्वयेही संबंध नाही, असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Dhananjay Munde-Ajit Pawar
Sandeep Kshirsagar : बीडमध्ये आणखी एक ट्विस्ट; संतोष देशमुख खूनप्रकरणी आक्रमक भूमिका घेणाऱ्या संदीप क्षीरसागरांनी घेतली अजितदादांची भेट (Video)

अजित पवार म्हणाले, माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्या वेळी मंत्रिपदावर राहावं, असं माझ्या बुद्धीला पटलं नाही. त्यामुळे सद्‌सदविवेकबुद्धीने मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. कारण, मी अत्यंत स्वच्छपणे काम केले होते.

सचिव, अधिकाऱ्यांकडून फायल आल्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेतो आणि त्यानंतर माझा निर्णय देतो. असं असतानाही मला त्या वेळी बदनाम करण्यात आले. जनमाणसांतील माझी प्रतिमा मलिन करण्यात आली. त्या बातम्या बघून मला वाटलं की आपण एवढं व्यवस्थितपणे काम करत असताना हे आरोप होत आहेत. एखाद्याला ते सहन होत नाही, त्यातून मी राजीनामा दिला, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Dhananjay Munde-Ajit Pawar
Mohol Politic's : मोहोळचं राजकारण पुन्हा पेटलं; उमेश पाटलांचा अजिंक्यराणा पाटलांवर पलटवार, म्हणाले, ‘बैलगाडीखाली कुत्रं नव्हे...’

अजितदादा म्हणाले, संतोष देशमुख प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सुद्धा म्हटलेले आहे. आम्ही कोणालाही वाचवणार नाही. कालही वाचलं नाही, आजही नाही आणि उद्याही कोणाला वाचवणार नाही. चुकीचं वागणाऱ्याला वाचविण्यासाठी आम्हाला जनतेने निवडून दिलेलं नाही. आम्ही चांगलं काम करणार, त्याच पद्धतीने आम्ही पुढं जाणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com