NCP vs BJP : फडणवीसांनी 'दादा'गिरी मोडीत काढली; माघार घेऊनही मोहोळ ठरले अजित पवारांवर भारी

NCP vs BJP : मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन;च्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तर मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. फडणवीस-पवार चर्चेनंतर हा तोडगा निघाला.
Ajit Pawar likely to be elected unopposed as Maharashtra Olympic Association President after Murli Mohol will be the vice-president
Ajit Pawar likely to be elected unopposed as Maharashtra Olympic Association President after Murli Mohol will be the vice-presidentSarkarnama
Published on
Updated on

NCP Vs BJP : अखेर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन निवडणुकीतून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वतः अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर मोहोळ दोन पावले मागे झाले आहेत. पण ही माघार घेताना बार्गेनिंग पॉवर कायम ठेवून भाजपने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये धडाक्यात एन्ट्री केली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळाच चर्चेचा विषय ठरला आहे. 2013 पासून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदी अजित पवार हे विराजमान आहेत. तब्बल 12 वर्षे अध्यक्षपदावर राहिलेल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा 4 वर्षांसाठी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी तयारी सुरु केली आहे. पण अजित पवार यांच्या बिनविरोध निवडीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी दंड थोपटत खोडा घातला होता.

निवडणुकीसाठी अजित पवारांविरोधात मोर्चेबांधणी करून भाजपने अनेक क्रीडा संघटनांचा पाठिंबा मिळविला होता. त्यामुळे निवडणूक हायव्होल्टेज होण्याची शक्यता होती. पण शुक्रवारी सायंकाळी मोठ्या घडामोडी घडल्या. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये या निवडणुकीवर तोडगा निघाला. त्यानंतर मोहोळ यांना माघार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पण या वाटाघाटी करताना कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये भाजपचीही एन्ट्री होणार आहे.

Ajit Pawar likely to be elected unopposed as Maharashtra Olympic Association President after Murli Mohol will be the vice-president
Ajit Pawar News : सारखंच कर्ज माफ कसं व्हायचं? बँका अडचणीत येतात; अजितदादांनी शेतकऱ्यांना फटकारलं

वाटाघाटीनुसार, 12 वर्षे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांना आता फक्त पुढील दोन वर्षांसाठी या संघटनेवर अध्यक्ष म्हणून राहता येणार आहे. त्यानंतर या संघटनेचे अध्यक्षपद हे भाजपकडे पर्यायाने मुरलीधर मोहोळ यांच्याकडे येणार असल्याचे सांगितले जात आहेत. तसेच सुरुवातीच्या 2 वर्षांमध्ये मुरलीधर मोहोळ हे वरिष्ठ उपाध्यक्ष देखील असणार आहेत. म्हणजे एक प्रकारे या निवडणुकीमधून भाजपने एक पाऊल मागे घेतले असले तरी प्रत्यक्षात भाजपने अनेक वर्षांपासूनच ऑलिंपिक संघटनेमधील अजित पवारांची दादागिरी मोडून काढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com