Ajit Pawar News : अजितदादांनी घेतली श्रीनिवास पवारांची भेट, तर युगेंद्र पवार शरद पवारांच्या भेटीला...

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे.
Sharad Pawar-Yugendra Pawar-Srinivas Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Yugendra Pawar-Srinivas Pawar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अजित पवार यांनी शिवसेना-भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून पवार कुटुंबीयही त्यात विभागले गेले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आज आपले बंधू श्रीनिवास पवार यांची भेट घेतली आहे, तर श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे शरद पवार यांना भेटले. या भेटीची चर्चा मात्र राज्यात रंगली आहे. (Ajitdada meet Srinivas Pawar, while Yugendra Pawar meet Sharad Pawar)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. पक्षाच्या तब्बल ३५ ते ४० आमदारांनी अजितदादांना साथ दिल्याचे सांगितले जात आहे. अजितदादांच्या बंडानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी साताऱ्यातून आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आपला झंझावाताला सुरुवात केली आहे.

Sharad Pawar-Yugendra Pawar-Srinivas Pawar-Ajit Pawar
Maharashtra Politic's : राजकीय गाठीभेटींना वेग, फडणवीसांची राष्ट्रवादी नेत्यांसोबत चर्चा;अजित पवार गटाला मिळणार ही मंत्रिपदे

कराडनंतर पवारांनी आपले एकेकाळचे खंदे समर्थक छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात पहिली सभा घेतली. त्यात त्यांनी आपली वीस वर्षांपूर्वी चूक झाली होती, त्याबद्दल माफी मागायला आलो आहे, असे म्हणत भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. दुसरीकडे, अजित पवार गटाकडूनही सभा घेतली जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Sharad Pawar-Yugendra Pawar-Srinivas Pawar-Ajit Pawar
Bhujbal Vs Rohit Pawar : रोहित पवार आईच्या पोटात होते, त्यावेळी मी आमदार अन्‌ महापौर होतो; छगन भुजबळ यांचा टोला

एकीकडे दोन्ही पवार एकमेकांना शह-कटशहा देत असताना आज पुन्हा एक घडामोड घडली आहे. तशीच घडामोड २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीनंतर घडली होती. राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले बंधू श्रीनिवास पवार यांची भेट घेतली आहे. एरवी ही भेट झाली असती तर त्याबाबत चर्चा झाली नाही. पण, श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हेही आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटले आहेत. त्यामुळे या दोन भेटीची चर्चा रंगली आहे.

Sharad Pawar-Yugendra Pawar-Srinivas Pawar-Ajit Pawar
Finance Ministry Issue : अर्थमंत्रिपदाबाबत उत्सुकता वाढली; जीएसटी परिषदेला फडणवीसांनी पाठविले ‘या’ मंत्र्याला

दरम्यान, अजित पवार यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली होती. त्यानंतर पवारांनी सर्व आमदारांना परत आणले होते, त्यावेळच्या उत्कंठावर्धक घडामोडीतही अजित पवार यांनी आपले बंधू श्रीनिवास पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे आजच्या भेटीचा तपशील कळू शकला नसला तरी त्याची चर्चा मात्र राज्यात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com