
Republic Day Chief Guest 2025 : यंदा भारत आपला 76वा प्रजासत्ताकदिन साजरा करत आहे आणि यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे आहेत. 1950मध्ये पहिल्यांदा जेव्हा प्रजासत्ताक दिवस साजरा केला गेला होता, तेव्हा देखील इंडोनेशियाच्याच राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. पहिल्या प्रजासत्ताक दिनापासूनच प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करण्याची परंपरा चालत आली आहे. 75 वर्षांच्या या यादीत जगभरातील अनेक देशांना भारताने हा सन्मान दिला आहे.
सर्वाधिकवेळा फ्रान्सचे नेते प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. एकूण सहावेळा असं झालं. एवढंच नाहीतर पाकिस्तानातून(Pakistan) ही दोनवेळा प्रमुख पाहुणे हजर राहिले होते. 1955 मध्ये पाकिस्तानचे गवर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद आणि 1965मध्ये पाकिस्तानचे कृषीमंत्री राणा अब्दुल हामिद हे प्रजासत्ताक दिवशी प्रमुख पाहुणे होते. भारताने आतापर्यंत आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातूनही प्रमुख पाहुणे बोलावले आहेत. एवढंच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राहिलेले आहेत. 2015मध्ये बराक ओबामा प्रमुख पाहुणे होते.
प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या सहा महिने अगोदर ही प्रक्रिया सुरू केली जाते. परराष्ट्र मंत्रालय ही संपूर्ण प्रक्रिया राबवते. सर्वात आधी राजकीय आणि राजनैतिक संबंध, आर्थिक आणि संरक्षण सहकार्य, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आणि वैश्विक संदर्भानुसारएक यादी बनवली जाते.
प्राथमिकतांच्या आधारावर ही यादी विविध पॅरामिटर्स लक्षात घेऊन तयार केली जाते. म्हणजे कधी एखाद्या देशाशी अतिशय चांगले संबंध असल्या कारणाने तेथून प्रमुख पाहुणे बोलावले जातात. तर कधी एखाद्या देशाशी संबंध चांगले नसले तरीही निमंत्रण दिले जाते, जेणेकरून भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध चांगले होतील. तसेच कधी एखाद्या विशिष्ट हेतूने देखील प्रमुख पाहुणे निश्चित केले जातात.
प्रमुख पाहुण्यासाठी प्रस्तावित देशांची नावे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पाठवली जातात. जर येथून मंजुरी मिळाली तर मग संबंधित प्रमुख पाहुण्यांची उपलब्धता तपासली जाते. जर ते उपलब्ध असतील तर परराष्ट्र मंत्रालय निवडलेल्या देशासोबत अधिकारीस्तरीय संपर्क ठेवतात.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.