Maharashtra Assembly Election: एकाच कुटुंबातील 'ही' मंडळी उतरणार वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या आखाड्यात

Family Members Different Parties Election: लोकसभेच्या निकालानंतर आणि हरियाणाच्याही निकालानंतर ही निवडणूक महाविकास आघाडी व महायुतीसाठी सोपी राहिली नाही. त्यामुळे चुरशीने होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Political Leader
Maharashtra Political LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर आणि हरियाणाच्याही निकालानंतर ही निवडणूक महाविकास आघाडी व महायुतीसाठी सोपी राहिली नाही. त्यामुळे चुरशीने होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सर्वत्र महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी अटातटीची लढत पहायला मिळणार आहे. यामुळे दोन्ही आघाड्यांसाठी आणि विविध पक्षांसाठी एक-एक जागा महत्त्वाची असणार आहे. त्यामुळेच स्थानिक राजकारणात वर्चस्व असलेल्या राजकीय नेत्यांनी, राजकीय कुटुंबांनी विधानसभेच्या उमेदवारीत आघाडी घेतली आहे.

या विधानसभा निवडणुकीसाठी एकाच कुटुंबतील सदस्य अगदी आई-वडील, भाऊ-भाऊ व भाऊ-बहीण सुद्धा अपवाद राहिले नाहीत. एकाच कुटुंबातील सदस्य विविध पक्षात सक्रिय असल्याचे दिसत आहेत. या निवडणुकीत तर संबंधित पक्षाकडून तिकीट मिळत नसल्याने किंवा आघाड्यांमध्ये तडजोड म्हणूनही एकाच कुटुंबातील सदस्य एकाच पक्षातून किंवा वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत असल्याचे दिसत आहे.

लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसकडून (Congress) आमदार अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसकडून धीरज देशमुख निवडणूक लढत आहेत. गेल्या निवडणुकीतही देशमुख बंधूनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये दोघेही विजयी झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा दोन्ही भाऊ नशीब अजमावत आहेत.

Maharashtra Political Leader
Congress News : मुंबई, कोल्हापुरप्रमाणे विधानसभा निवडणुकीनंतरही बसणार काँग्रेसला धक्का?

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे भाजपकडून (Bjp) कणकवली मतदारसंघातून नशीब अजमावत आहेत. त्यासोबतच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करीत निलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर त्यांचे चुलत बंधू अमित ठाकरे शिवडी मतदारसंघातून पहिल्यांदा नशीब अजमावणार आहेत. काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख रिंगणात उतरले आहेत तर त्यांचे पुतणे तथा भाजपचे उमेदवार आशिष देशमुख सावनेर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Maharashtra Political Leader
Marathwada News: अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे यांच्यात खरेच वाद आहे का? जाणकारांना वेगळेच वाटते !

भाजपचे नवी मुंबईतील नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना पक्षाकडून ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांचे चिरंजीव माजी आमदार संदीप नाईक यांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या सर्वंच लढतीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना शिंदे गटातील उद्योग मंत्री उदय सामंत हे कोकणातील रत्नागिरी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर त्यांचे बंधू किरण सामंत हे राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

भाजपकडून माजी मंत्री आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर त्यांचे बंधू विनोद शेलार मालाड विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन भाऊ प्रथमच भाजपकडून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

Maharashtra Political Leader
Maharashtra BJP: भाजपला आणखी एक धक्का; मुस्लिम लिगच्या असलम खान यांचा अर्ज अवैध

महायुतीमध्ये नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहे. आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून नांदगावसाठी उमेदवारीही जाहीर झाली आहे. यामुळे महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने समीर भुजबळ नाराज असल्याची माहिती आहे. यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काका एका पक्षाकडून तर दुसरीकडे पुतण्या अपक्ष म्हणून नशीब अजमवणार आहेत.

या सर्वच नात्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीत कॊण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Political Leader
Nagpur MVA : दोन बंडखोर जिचकरांनी वाढवले महाविकास आघाडीचे टेन्शन, काटोल, नागपूर पश्चिममध्ये काय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com