Nagpur MVA : दोन बंडखोर जिचकरांनी वाढवले महाविकास आघाडीचे टेन्शन, काटोल, नागपूर पश्चिममध्ये काय होणार?

Assembly Election Narendra Jichkar Yajnavalkya Jichkar : काटोल आणि नागपूर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार आहे. दोन्ही जागांवर बंडखोरी होणार आहे.
Yajnavalkya Jichkar  Narendra Jichkar
sarkarnamaYajnavalkya Jichkar Narendra Jichkar
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election : नागपूर जिल्ह्यात दोन बंडखोर जिचकारांनी महाविकास आघाडीचे चांगलेच टेंशन वाढले आहे. पश्चिम नागपूरमधून काँग्रेसने निलंबित केलेले नरेंद्र जिचकार तर काटोल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसेच याज्ञवल्क्य जिचकार यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. दोघांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात मोठा राडा झाला होता. ठाकरे आणि जिचकार यांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते मंचावर उपस्थित होते. त्यानंतर जिचकार यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. तेव्हापासूनच जिचकार यांनी विकास ठाकरे यांच्या विरोधात मोहीम उघडली.

नरेंद्र जिचकर यांनी जनआशीर्वाद यात्रा काढून विकास ठाकरे यांना आव्हान देणे सुरू केले. आज (सोमवारी) उमेदवार अर्ज दाखल करून त्यांनी ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढण्याचा पक्का निर्धार केला. मागील निवडणुकीत विकास ठाकरे अवघ्या दहा हजारांच्या मताधिक्यांनी विजयी झाले होते. जिचकारांची बंडखोरी ठाकरे यांच्यासाठी धोक्याची ठरू शकते.

Yajnavalkya Jichkar  Narendra Jichkar
Nagpur Congress : आंबेडकरांकडून काँग्रेसला दे धक्का; माजी मंत्र्यांचा वंचितमध्ये प्रवेश, पक्ष सोडताना म्हणाले,....

काटोलमध्ये बंडखोरी

काटोल विधानसभा मतदारसंघात राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात याज्ञवल्क्य जिचकारदोन वर्षांपासूनच निवडणुकीची तयारी करीत होते. 25 वर्षांत काटोलमध्ये एकच लोकप्रितिनिधी आहे. या काळात मतदारसंघाचा काहीच विकास झाला नाही, असा त्यांचा आरोप आहे. सुरुवातीला त्यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती.

काँग्रेस नेत्यांनी आपल्याला तयारी करण्याचे सांगितले होते असा त्यांचा दावा होता. तिकीटही आपल्याला मिळेल असा विश्वासही त्यांना होता. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. अनिल देशमुख यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.

सलील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात

अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना याज्ञवल्क्य जिचकार यांनी आव्हान दिले आहे. ते किती मतांपर्यंत मजल मारतात यावर सलील देशमुख यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Yajnavalkya Jichkar  Narendra Jichkar
Kolhapur North Constituency: महाडिकांच्या डावात पाहुणा 'नाना' बाद, सत्यजित कदमांच्या मेहनतीवर पाणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com