Baramati Politics : बारामतीचा 'रुबाब'च लय भारी..! 3 खासदार अन् मंत्रिपदही मिळणार

Sharad Pawar And Ajit Pawar News : बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता.पण आता...
Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule Sunetra Pawar
Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : बारामतीशी महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं राजकारण जोडलं गेलं आहे. गेल्या पाच दशकांपासून पवार कुटुंबाचा राजकीय वर्तुळात मोठा दबदबा राहिला आहे. अशा राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान असलेल्या बारामतीचा रुबाबच लयभारी असं म्हणण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. बारामतीला आता तीन खासदार मिळाले आहे. त्याचसोबत मंत्रिपदही मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची हॅट्ट्रिक केली आहे.तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा राज्यसभेवर खासदार आहेत. आता सुनेत्रा पवारांच्या रुपाने तिसरा खासदार बारामतीला मिळाला आहे. या खासदारकीच्या सुनेत्रा पवारांना दिमतीला आता मंत्रिपदही पदरात पडणार आहे. यासंबंधीचे सविस्तर वृत्त आणि विश्लेषण 'साम' या वृत्तवाहिनीवर पाहता येईल.

राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अनेक नावं चर्चेत होती.त्यात मंत्री छगन भुजबळांसह बाबा सिद्दीकी,समीर भुजबळ आणि नितीन पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.अखेर अनेक राजकीय खलबतांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सुनेत्रा पवार यांनाच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.विरोधात कोणताही उमेदवार न आल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता.पण आता त्यानंतर काही दिवसांतच सुनेत्रा पवार खासदार म्हणून राज्यसभेवर गेल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारली.दहापैकी तब्बल आठ जागा जिंकत शरद पवार गटाने दणदणीत यश मिळवलं.

Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule Sunetra Pawar
Chhagan Bhujbal : लोकसभेपाठोपाठ भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता कट; म्हणाले, 'नाराजी दिसते का? प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होतं नाही'

तर दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फक्त एका जागेवर सुनील तटकरेंच्या रुपानं विजय मिळाला. पण आता राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याने सुनेत्रा पवारांच्या रुपानं आता बारामतीत तिसरा खासदार असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तर शरद पवार (Sharad Pawar) हे राज्यसभेवर खासदार आहेत. आता सुनेत्रा पवार यादेखील राज्यसभेच्या खासदार असणार आहेत.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचे पुतणे रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे एकाचवेळी बारामतीच्या पवार कुटुंबातून तीन खासदार आणि दोन आमदार राजकारणात असणार आहेत.

Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule Sunetra Pawar
Sunetra Pawar News : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; बारामतीला मिळाला तिसरा खासदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com