Beed Lok Sabha Constituency : बीडमध्ये यंदा परंपरा मोडणार? 6 टर्म महिला खासदार; क्षीरसागर अन् मुंडे कुटुंबाचा राहिलाय दबदबा

Bjp Political : भाजपने सात टर्म तर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप व जनता दलाचा प्रत्येकी एक टर्म खासदार राहिला. यातील जवळपास सहा टर्म म्हणजे साधरणता 26 वर्ष महिलांच्या हाती येथील सत्ता होती.
Kesharkakau kshirsagar, Rajni Patil, Pritam Munde
Kesharkakau kshirsagar, Rajni Patil, Pritam Munde Sarkarnama

Beed News : मराठवाड्यातील काँग्रेसचा गड अशी ओळख असणाऱ्या बीड मतदारसंघाची चर्चा यावेळी विविध कारणांनी होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते आताच्या 2024 पर्यंत सर्वाधिकाळ सत्ता आणि विजय काँग्रेस व भाजप पक्षाने मिळवलेला आहे. या मतदार संघात सहा टर्म महिला खासदार निवडून आल्या आहेत तर क्षीरसागर व मुंडे या कुटुंबाचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. विशेषतः 1996 साली तीन महिला उमेदवारातच झालेली लढत रंगतदार ठरली होती.

बीड मतदारंसघाचा विचार केला तर 1957 ते 2019 पर्यंत झालेल्या सोळा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, काँग्रेस (आय), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress) म्हणजे एकाच पक्षाने तब्बल आठ वेळा विजय मिळवला आहे. त्यासोबतच भाजपने सात टर्म तर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप व जनता दलाचा प्रत्येकी एक टर्म खासदार राहिला. यातील जवळपास सहा टर्म म्हणजे साधरणता 26 वर्ष महिलांच्या हाती येथील सत्ता होती. (Beed Lok Sabha Constituency News)

Kesharkakau kshirsagar, Rajni Patil, Pritam Munde
India Alliance : काँग्रेससोबत ना लव्ह मॅरेज, ना अरेंज मॅरेज! निकालाआधीच केजरीवालांनी वाढवलं ‘इंडिया’चं टेन्शन

बीड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला हा मतदारसंघ होता. त्यानंतर या ठिकाणी भाजपने (Bjp) वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यासोबतच गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य या मतदारसंघावर राहिले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ बीड लोकसभा मतदारसंघावरती काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. 1995 नंतर काळ बदलला आणि या ठिकाणी भाजपचे प्राबल्य दिसून आले. त्यानंतरच्या काळात दोन वेळेसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ही बाजी मारली आहे, पण गेल्या वीस वर्षाच्या काळात या ठिकाणी भाजपचे मोठे प्राबल्य आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातून 1952-57 काँग्रेसचे रामचंद्र गोविंद परांजपे विजयी झाले. 1957-62 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे रखमाजी धोंडिबा पाटील यांनी बाजी मारली. 1962-67 मध्ये काँग्रेसचे द्वारकादास मंत्री निवडून आले. 1967-71 मध्ये माकपचे नाना रामचंद्र पाटील पहिल्यांदाच विजयी झाले. 1971-77 मध्ये काँग्रेसचे सयाजीराव त्रिंबकराव पंडित विजयी झाले. 1977-80 काँग्रेसचे गंगाधरअप्पा महारुद्रप्पा बुरांडे निवडून आले होते. 180-84 साली काँग्रेसच्या केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर या महिला खासदार पहिल्यांदा विजयी ठरल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

1984-1989 साली काँग्रेसच्या केशरबाई क्षीरसागर विजयी झाल्या. तर 1989-1991 मध्ये जनता दलाचे बबनराव ढाकणे विजयी झाले. 1991-96 मध्ये केशरबाई क्षीरसागर यांनी बाजी मारली, तर 1996-98 मध्ये भाजपच्या रजनी पाटील (Rajni Patil) विजयी झाल्या. 1998-99 मध्ये भाजपचे जयसिंगराव गायकवाड -पाटील, 1999-2004 भाजपकडून जयसिंगराव गायकवाड हे सलग दोन वेळा विजयी झाले.

त्यानंतर 2004-2009 राष्ट्रवादीकडून जयसिंगराव गायकवाड पाटील विजयी झाले. 2009-2014 मध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी बाजी मारली. 2014 साली पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे विजयी झाले त्यानंतर महिनाभरातच त्यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत प्रीतम मुंडे विजयी झाल्या.

2024 च्या निवडणुकीवेळी प्रीतम मुंडे हॅट्ट्रीक करतील, असे वाटत असताना त्यांची उमेदवारी कापून त्यांच्या भगिनी व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे निवडणूक रिंगणात उतरले होते. या दोघांमध्ये यावेळेस चुरशीची निवडणूक झाली असून त्यामुळे 4 जूनच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

Kesharkakau kshirsagar, Rajni Patil, Pritam Munde
Manoj Jarange News : मनोज जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, जमावाची तरुणाला बेदम मारहाण

महिला खासदाराचे राहिले 26 वर्ष वर्चस्व

1980-84 साली काँग्रेसच्या केशरबाई क्षीरसागर या महिला खासदार पहिल्यांदा विजयी ठरल्या. त्यानंतर 1984-89 साली केशरकाकू क्षीरसागर पुन्हा निवडून आल्या. 1991-96 मध्ये केशरकाकू क्षीरसागर तिसऱ्यांदा निवडून आल्या जवळपास 14 वर्ष त्या खासदार होत्या. तर 1996-98 मध्ये भाजपच्या रजनी पाटील या पहिल्यांदा विजयी झाल्या. त्या जवळपास दोन वर्ष खासदार होत्या. तर 2014 च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी प्रथम विजय मिळवला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत प्रीतम मुंडे विजयी झाल्या, त्या जवळपास दहा वर्ष खासदार होत्या.

1996 साली तीन महिला उमेदवारातच रंगतदार लढत

1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तीन महिला उमेदवारातच लढत झाली. त्यावेळी काँग्रेसकडून केशरकाकू क्षीरसागर या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या तर भाजपने रजनी पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. तर जनता दलाकडून सुशीला मोराळे यांना उमेदवारी देण्या आली होती. या चुरशीच्या लढतीत भाजपच्या रजनी पाटील यांनी बाजी मारली होती.

Kesharkakau kshirsagar, Rajni Patil, Pritam Munde
Jitendra Awhad News : '...तर सगळी मनुस्मृती अभ्यासक्रमात येईल', जितेंद्र आव्हाडांचा दावा

क्षीरसागर, मुंडे कुटुंबाचे वर्चस्व

बीड लोकसभा निवडणुकीत जवळपास 30 वर्ष म्हणजेच सहा टर्म पेक्षा अधिककाळ केशरकाकू क्षीरसागर व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कुटुंबाचे या मतदार संघावर वरचष्मा राहिला. क्षीरसागर कुटुंबाचे 14 वर्ष वर्चस्व होते केशरकाकू तीन टर्म खासदार राहिल्या तर मुंडे कुटुंबाचे 15 वर्ष वर्चस्व होते. या मध्ये गोपीनाथ मुंडे पाच वर्ष तर प्रीतम मुंडे 10 वर्ष खासदार राहिल्या.

Kesharkakau kshirsagar, Rajni Patil, Pritam Munde
Beed Loksabha Election : बीडच्या मतमोजणीसाठी दोन 'IAS' अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com