Bhagat singh Koshyari : बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात कोश्यारींचा मोठा गौप्यस्फोट :‘ मी दुसऱ्याच दिवशी सही करणार होतो; पण...’

उद्धव ठाकरे तर सज्जन माणूस आहेत.
Bhagat singh Koshyari
Bhagat singh Koshyari Sarkarnama

मुंबई : राज्यपाल (Governor) नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागासंदर्भात माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते पाच पानी पत्र पाठवलं नसतं, तर मी दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशींवर सही करणार होतो, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे. (Bhagat singh Koshyari's secret explosion regarding appointment of 12 MLAs in the Legislative Council)

महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर एका वृत्तवहिनीशी कोश्यारी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीची शिष्टमंडळं माझ्याकडे यायची. मी त्यांना एकदा सांगितले की, हे पहिले पाच पानी पत्र बघा. पाच पानी पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. हा कायदा, तो कायदा म्हणत धमकावत आहात.

Bhagat singh Koshyari
Pawar-Shinde News : मुख्यमंत्रिपदाबाबत पवारांची सुशीलकुमार शिंदेंना गुगली : ‘तुमचं काय सांगता येत नाही...’

पत्रात शेवटी लिहिलं होतं की, पुढील १५ दिवसांत मंजूर करा. कुठं लिहिलं आहे की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतात की हे एवढ्या दिवसांत मंजूर करा म्हणून. हे कुठं लिहिलंय संविधानात. ते पत्र पाठवलं नसतं, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी १२ आमदारांच्या नियुक्तीच्या शिफारशींवर सही करणार होतो, असे कोश्यारी यांनी सांगितले.

Bhagat singh Koshyari
Uddhav Thackeray News: निवडणूक आयोगावर केस केली जाईल : उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध चांगलेच होते. पण त्यांचे सल्लागार कोण होते. शिवसेनेचे आमदार माझ्याकडे येऊन आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे हे शकुनीमामांच्या चक्रव्यूहमध्ये अडकले आहेत, असे सांगायचे. माहिती नाही की, त्यांना कोणते शकुनीमामा मिळाले होते, असे कोश्यारी या वेळी म्हणाले.

Bhagat singh Koshyari
ShivSena News : ...तर शिवसेनेसंदर्भातील निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द होऊ शकतो; कायदेतज्ज्ञांचे भाकीत

माजी राज्यपाल म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे लोकच माझ्याकडे येऊन बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण होते, मला माहिती नाही. उद्धव ठाकरे तर सज्जन माणूस आहेत, बिचारे राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. ते कसे अडकले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का. पंधरा दिवसांत मंजूर करा, असं पत्र लिहिलं म्हणून मी बोललो. माणूस सज्जन नसता, राजकारणी नसता. राजकारणातील शरद पवार यांच्यासारख्या ट्रिक माहिती असत्या तर असे पत्र लिहिलं असतं का. चार ओळीचं पत्र लिहून पाठवलं असतं, तर मला सही करावीच लागली असती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com