
ता. २९ जानेवारीच्या अमांत कुंडलीमध्ये कर्क लग्न उदित असून सप्तम स्थानात मकर राशीमध्ये श्रवण नक्षत्रात अमावस्या येत आहे. सोबत बुध-प्लुटो असून नवम स्थानात राहू-नेपच्युन शुक्र, दशमात हर्षल, लाभस्थानी गुरू व व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता अष्टमातील शनीमुळे या महिन्यात ज्येष्ठ नेते, उद्योगपती किंवा कायदेतज्ज्ञ, ज्येष्ठ राजकीय, सामाजिक व्यक्ती यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात.
या योगामुळे भूकंप, वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमधून मोठी जीवितहानी संभवते. या काळात नवीन कायदे/घटना/विधेयके यांना मंजुरी मिळेल. याशिवाय मोठी रेल्वे दुर्घटना किंवा वाहन अपघात होण्याची शक्यता वाटते. लग्नभावारंभी मंगळ असल्याने या काळात हिंसा/जाळपोळ / आगीच्या दुर्घटना संभवतात. मोठी घरे, इमारती यांना आगीच्या दुर्घटनेमुळे नुकसान संभवते. भूकंपासारख्या दुर्घटनेतून घरांची पडझड या काळात होण्याची शक्यता वाटते.
भाग्य स्थानातील शुक्र, राहू, नेपच्युन योग कलाकार, स्त्री वर्गासाठी प्रतिकूल राहील. अपहरण किंवा स्त्री अत्याचाराच्या घटना या काळात संभवतात. मोठे चित्रपट यशस्वी होतील. या जोडीला लाभस्थानी गुरू असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये मोठे चढउतार संभवतात. मोठे करेक्शन’ होईल.
तृतीयेतील केतू व बुध-प्लुटो युती तसेच पंचमेश मंगळ व्ययात असल्यामुळे लहान मुले, खेळाडू, लेखक, साहित्यिक यांचेसाठी हा महिना प्रतिकूल राहील. लहान मुले, विद्यार्थी यांचे अपघात या काळात संभवतात. मोठे लेखक, साहित्यिकांचे मृत्यू या काळात संभवितात. या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता राहील. देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये घसरण होईल. रुपयाचे मूल्य कमी होईल. दशमातील हर्षलमुळे काही राज्यांतील सरकारे अल्पमतात येण्याची शक्यता राहील. सत्ताधारी आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता राहील. मोठे पक्ष फुटतील. पक्षांतराच्या घटना होतील. उत्तरेकडील राज्ये अस्थिर होतील.
१४ मे २०२४ पर्यंत वृषभ राशीतील गुरूमुळे मे महिन्यापर्यंत सोन्या-चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता असून शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण राहील. बँका, पतपेढी, फायनान्स कंपनी यांच्यासाठी वृषभ राशीतील गुरू अनुकूल राहील. एकूण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वृषभ राशीतील गुरू उत्तम राहील. उंची वस्तू, अन्नधान्य, वस्त्र, अलंकार, फळ, फूल, सुवासिक वस्तु, हॉटेल, शेती, फॅशन या संबंधित वस्तूंना व व्यवसायासाठी वृषभ गुरू अनुकूल राहील. खनिजे, खाणींच्या व्यवसायासाठी तसेच इन्शुरन्स, पेन्शनर यांच्यासाठी वृषभ गुरू अनुकूल राहील. व्यक्तिगत राशीनुसार मेष, कन्या, मकर व वृश्चिक या राशींच्या व्यक्तींसाठी वृषभ गुरूचे भ्रमण लाभदायक राहील.
या राशीच्या व्यक्तींना वृषभ गुरूमुळे नशीबाची उत्तम साथ मिळून परीक्षेत यश, आर्थिक सुबत्ता, आरोग्य, विवाहसौख्य, संततीसौख्य प्रगती, धार्मिक, मंगलकार्य या माध्यमातून चांगली फळे मिळण्याची शक्यता आहे. बाकी राशींना नशीबाची योग्य साथ नसल्याने संघर्ष किंवा साधारण यश मिळण्याची शक्यता राहील. अशा व्यक्तींनी गुरूसाठी गुरुजनांची किंवा दत्तगुरू, सत्पुरुषांची उपासना करावी. गुरुवारी मंदिरात दानधर्म करावे. पिवळ्या वस्तू किंवा धान्य दान द्यावे.
१४ मे २०२७ नंतर गुरूचे भ्रमण मिथुन राशीतून होणार असून पुढील १३ महिने मिथुन राशीतील होणारे गुरूचे भ्रमण लेखक, साहित्यिक, पत्रकार, प्रसारमाध्यमे, मंदिरे, धर्मप्रमुख, सल्लागार, पुरोहित यांच्यासाठी विशेष अनुकूल राहणार आहे. नवीन चित्रपटांना मोठे यश मिळेल. कलाकारांचे गौरव होतील. या जोडीला कायदे तज्ज्ञ, वकील, संशोधकांसाठी मिथुन राशीतील गुरू लाभदायक राहील. शेअर मार्केटसाठी गुरू फायदेशीर असून मार्केटमध्ये पुढील वर्षी तेजी कायम राहील. उंची वस्तू, वस्त्र, अलंकार यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल. हॉटेल, बँका, फायनान्स कंपन्यांसाठी अनुकूल राहील.
मिथुन राशीतील गुरू वृषभ, तूळ, कुंभ व धनू राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना नशीबाची उत्तम साथ मिळाल्याने परीक्षेत मोठे यश, विवाह सौख्य, संतती सौख्य, प्रगती, आर्थिक सुबत्ता, मोठे लाभ, धार्मिक, मंगल कार्यात यश, प्रसिद्धी, प्रतिष्ठा या सारखी शुभफळे मिळतील. इतर राशींना प्रत्येक कार्यात कष्टाने यशप्राप्ती होईल. गुरूचे अनुकूल फळ मिळण्यासाठी दत्तगुरू किंवा सत्पुरुषांची उपासना करावी. दर गुरुवारी पिवळे पदार्थ, पिवळे पदार्थ, पिवळे धान्य यासारख्या वस्तूंचे दान द्यावे.
- नैसर्गिक आपत्ती/ अपघात / आगीच्या दुर्घटना, स्फोटक घटना यातून मोठी हानी
- एखाद्या राज्यातील सरकार अस्थिर होईल.
- पक्षांतर किंवा मोठ्या पक्षात फूट पडेल.-
- शेअर मार्केटमध्ये पडझड
- रुपयाचे अवमूल्यांकन
गुरू - १४ मेपर्यंत वृषभ नंतर मिथुन
शनी - २९ मार्चपर्यंत कुंभ नंतर मीन
राहू - १८ मेपर्यंत मीन नंतर कुंभ
केतू - १८ मेपर्यंत कन्या नंतर सिंह
हर्षल - १९ मार्चपर्यंत मेष नंतर वृषभ
नेपच्युन - जून २०३४ पर्यंत मीन
प्लुटो - मार्च २०३९ पर्यंत मकर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.