Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकने वाढवले भाजपचे टेन्शन; 'ऑपरेशन लोटस'ला मतदारांनी नाकारले : मध्यप्रदेश अन् महाराष्ट्रासाठीही धोक्याची धंटा...

Karnataka Assembly Elections Result : मध्य प्रदेश अन् महाराष्ट्रासाठीही धोक्याची धंटा...
Rahul Gandhi, Narendra Modi News
Rahul Gandhi, Narendra Modi NewsSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसने १३६ जागा जिंकत ऐतिहासीक विजय मिळवला आहे. भाजपला केवळ ६४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर जेडीएस'ला ही २० जागांवर समाधान मानावे लागले. कर्नाटकमध्ये भाजपने राबवलेले ऑपरेशन लोटसमुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा गेल्याची चर्चा होत आहे.

त्यामुळे भाजपला मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. या विजयाने काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. विजयानंतर देशभरात काँग्रेसच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. 2018 च्या निवडणुकीत 104 काँग्रेसला 80 आणि जेडीएसा 37 जागा मिळाल्या होत्या. कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकु परिस्थिती निर्णण झाली होती. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस चे सरकार स्थापन झाले. एच. डी. कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

Rahul Gandhi, Narendra Modi News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

त्यानंतर २०१९ मध्ये भाजपने 'ऑपरेशन लोटस' राबवत काँग्रेस (Congress) आणि जेडीएसचे आमदार फोडले आणि पुन्हा येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. काँग्रेस आणि जेडीएसच्या 16 आमदारांना फोडत भाजपने (BJP) सरकार स्थापन केले. मात्र, त्याचा फटका भाजपला या निवडणुकीत बसला आहे. भाजपने 'ऑपरेशन लोटस' राबवल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा गेला. भाजपने काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार पडाले नसते तर या निवडणुकीत परिस्थिती वेगळी दिसली असती.

कर्नाटक प्रमाणेच मध्यप्रदेशातही भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांना फोडत काँग्रेसचे सरकार पाडले. शिंदे यांच्यासोबत काँग्रेसचे 16 आमदार फुटले होते. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार कोसळे, पुढील काही महिन्यांमध्ये मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येथेही भाजपला हा मुद्दा त्रासदायक ठरू शकतो.

Rahul Gandhi, Narendra Modi News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकात खर्गेंचा करिश्मा; नेतृत्वावर शिक्कामोर्तब; विजयानंतर परसेप्शन बदलणार

भाजपने कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातही (Maharashtra) महाविकास आघाडीचे सरकार पाडले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेला धक्का दिला. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचे महानाट्य घडले. कर्नाटच्या निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) टेन्शन वाढण्याची शक्याता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com