BJP Vs Congress : समान संधीचे सोने करण्याचे भाजप-काँग्रेसपुढे आव्हान!

Nagpur Vidhan sabha Election : ...याचा व्हायचा तो परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला ; हे बघता भाजपला यावेळी विजयासाठी चांगलेच झुंजावे लागणार असल्याचे दिसून येते.
BJP and Congress Flags
BJP and Congress FlagsSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी या दोन वजनदार नेत्यांचा जिल्हा असला तरी नागपूरमध्ये काँग्रेसचे तगड्या आव्हानांचा सामना भाजपला करावा लागणार आहे. दोन्ही पक्षांना विजयाची समान संधी येथे दिसत असून आता सर्व खेळ उमेदवारांवर राहणार आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नागपूर जिल्ह्याची ओळख होती. काँग्रेस नेत्यांची अंतर्गत भांडणे आणि पाडापाडीमुळे त्यांची स्वतःच्या हातानेच तो पाडला असल्याचं दिसून येतं. याचा अचूक लाभ घेऊन उरलासुरला किल्ला भाजपने(BJP) पोखरून काढला. भाजपने आधी नागपूर महापालिका हाती घेतली. त्यानंतर एक एक विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेणे सुरू केले. 2014च्या निवडणुकीत नागपूर शहराला भाजपने काँग्रेसमुक्त केले.

BJP and Congress Flags
Election Commission on Rashmi Shukla : रश्मी शुक्लांबाबत काँग्रेसच्या 'त्या' मागणीवर अखेर निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका!

ग्रामीणमध्ये सावनेरचे सुनील केदार यांचा अपवाद वगळता पाच मतदारसंघावर भाजपने भगवा फडकावला होता. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले. त्यांच्या जोडीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आले. त्यामुळे भाजपची गाडी सुसाट सुटली होती. आता आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही, पुन्हा आपलीच सत्ता येणार हा अतिआत्मविश्वास भाजपला 2019च्या निवडणुकीत भोवला. तत्कालीन ऊर्जामंत्री आणि भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, दक्षिण नागपूरचे तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापून भाजपने सर्वांनाच धक्का दिला.

पश्चिमचे आमदार सुधाकर देशमुख यांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवले. कामठी, काटोल-नरखेड, पश्चिम नागपूर, रामटेक विधानसभेचे उमेदवारांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवले होते. यातून ओबीसींच्या विरोधात भाजप असल्याचे नॅरेटिव्ह निर्माण झाले होते. याचा व्हायचा तो परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला.

BJP and Congress Flags
Election Commission On Exit polls : 'एक्झिट पोल्स' अन् मीडियाच्या अतिउतावीळपणावर निवडणूक आयोगाने ठेवलं बोट!

नागपूर शहरातील पश्चिम आणि उत्तर तर ग्रामीणधील काटोल, उमरेड आणि रामटेक अशा एकूण पाच मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले. यात दक्षिण आणि मध्य नागपूरमध्ये अगदी थोडक्या मतांनी भाजपचे उमेदवार बचावले. लोकसभेच्या निवडणुकीतही नितीन गडकरी यांना विजयासाठी काँग्रेसने(Congress) चांगलेच झुंजवले. सत्तेसोबत येणारी गुर्मी भाजपला भोवली. कार्यकर्त्यांची नाराजी ओढावून घ्यावी लागली. लोकसभेच्या निकालाने काँग्रेसच्या आशा चांगल्याच उंचावल्या आहेत. हे बघता भाजपला यावेळी विजयासाठी चांगलेच झुंजावे लागणार असल्याचे दिसून येते. सोबतच भाजपला बंडखोरांनाही आवरावे लागणार असल्याचे यावेळी दिसून येते.

2019 निवडणूक निकाल -

दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस (भाजप)

मध्य - विकास कुंभारे (भाजप)

पूर्व - कृष्णा खोपडे (भाजप)

दक्षिण- मोहन मते (भाजप)

पश्चिम- विकास ठाकरे (काँग्रेस)

उत्तर- नितीन राऊत (काँग्रेस)

सावनेर - सुनील केदार (काँग्रेस)

उमरेड - राजू पारवे (काँग्रेस)

काटोल - अनिल देशमुख (राष्ट्रवादी)

हिंगणा- समीर मेघे (भाजप)

रामटेक - आशिष जयस्वाल (अपक्ष)

कामठी- टेकचंद सावरकर (भाजप)

2014 निवडणूक निकाल -

दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस (भाजप)

मध्य - विकास कुंभारे (भाजप)

पूर्व - कृष्णा खोपडे (भाजप)

पश्चिम - सुधाकर देशमुख (भाजप)

दक्षिण - सुधाकर कोहळे (भाजप)

उत्तर - डॉ. मिलिंद माने (भाजप)

सावनेर - सुनील केदार (काँग्रेस)

उमरेड - सुधीर पारवे (भाजप)

काटोल - आशिष देशमुख (भाजप)

हिंगणा - समीर मेघे (भाजप)

रामटेक- आशिष जयस्वाल (शिवसेना)

कामठी- चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com