IPS Ravi Sinha New RAW Chief: छत्तीसगड केडरचे 'आयपीएस' रवी सिन्हा 'रॉ'चे नवे प्रमुख

New RAW Chief: विद्यमान रॉ प्रमुख आयपीएस सामंत गोयल यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
IPS Ravi Sinha New RAW Chief:
IPS Ravi Sinha New RAW Chief: Sarkarnama
Published on
Updated on

IPS Ravi Sinha New RAW Chief: कॅबिनेट सचिवालयातील विशेष सचिव रवी सिन्हा यांच्याकडे देशाची गुप्तचर संस्था 'रॉ' च्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रवी सिन्हा हे छत्तीसगड केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर आहेत. दोन वर्षांसाठी सिन्हा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. (New RAW Chief)

आयपीएस सामंत गोयल यांच्या जागेवर नियुक्ती

विद्यमान रॉ प्रमुख आयपीएस सामंत गोयल यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामंत गोयल हे ३० जून रोजी निवृत्त झाल्यानंतर रवी सिन्हा त्यांची जागा घेतील. (Nationa News)

IPS Ravi Sinha New RAW Chief:
Rahul Gandhi Birthday : थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भिडणारा नेता राहुल गांधी

गुप्तचर यंत्रणेला बळकटी

भारताच्या गुप्तचर यंत्रणेला बळकटी देण्यासाठी आणि भारत- चीनच्या सीमेवर अलीकडील तणावाच्या पार्श्वभूमीवर सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रवी सिन्हा सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत.मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. (National Politics)

सात वर्षांपासून रॉ'चे ऑपरेशनल डिव्हिजन

रवी सिन्हा, छत्तीसगड केडरचे 1988 च्या बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी असून गेल्या सात वर्षांपासून RAW मध्ये ऑपरेशनल डिव्हिजनचे प्रमुख म्हणून काम करत आहेत.गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

IPS Ravi Sinha New RAW Chief:
Ajit Pawar News : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार का? अजित पवार म्हणाले...

कोण आहेत रवी सिन्हा

रवी सिन्हा हा बिहारमधील भोजपूर जिल्ह्याचे रहिवासी आहे. रवी सिन्हा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.1988 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून मध्यप्रदेश केडर मिळाले. 2000 मध्ये, जेव्हा तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने छत्तीसगड राज्य वेगळे केल्यानंतर ते छत्तीसगड केडरमध्ये गेले.

IPS रवी सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात प्रधान कर्मचारी अधिकारी (PSO) आहेत. हे पद विशेष सचिव दर्जाचे आहे. आता रॉ'च्या प्रमुख पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रॉ'कडे देशविरोधी कारवाया करणाऱ्यांची गुप्त माहिती गोळा करण्याची जबाबदारी आहे.कोणत्याही देशाच्या घडामोडींचा भारतावर परिणाम होणार असेल रॉ त्याकडे लक्ष ठेवण्याचे काम करते. रॉ राष्ट्रहितासाठी मोठ्या मोहिमाही राबवत असते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या यांच्या सरकारमध्ये रॉची स्थापना झाली. रामेश्वर नाम काव हे रॉ'चे पहिले प्रमुख होते. रॉ'चे रिपोर्टिंग थेट पंतप्रधानांना असते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com