CM Eknath Shinde Birthday : राजकारण विसरून तांबड्या मातीत घाम गाळणारा मुख्यमंत्री...

CM Eknath Shinde Birthday News: ज्या मातीत आपण जन्मलो, खेळलो, बागडलो त्या मातीचे ऋण कधीही विसरायचे नसतात अशी शिकवण असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
CM Eknath Shinde Birthday
CM Eknath Shinde Birthday Sarkarnama

CM Eknath Shinde : ज्या मातीत आपण जन्मलो, खेळलो, बागडलो त्या मातीचे ऋण कधीही विसरायचे नसतात, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री झाला तरी आपल्या मातीला विसरला नाही, हे दाखवून देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संस्कृती आचरणात आणली आहे. आजही ते सत्तेच्या सारीपाटावरील खेळ खेळत असताना साताऱ्यातील आपल्या दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या दुर्गम, डोंगराळ भागातील गावात येऊन शेती करतात. राजकारण विसरून शेतात रमून जातात. यानिमित्ताने त्यांची गावाच्या मातीशी असलेली नाळ आजही कायम आहे. (CM Eknath Shinde Birthday)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतीची खूप आवड आहे. ठाणे जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या या नेत्याने आजही शेती आणि मातीशी नाते तोडलेले नाही. वेळात वेळ काढत ते शेती करण्याची आवड जपत असतात. ते आपल्या सातारा जिल्ह्यातील मूळगावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या ठिकाणी भात आणि स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या कामात हातभार लावत असतात. सण, उत्सवाप्रमाणेच शेतातील प्रत्येक सुगीला त्यांची पावले आपसूकच गावाकडे वळतात. शेतात काम करून घाम गाळण्याचा आनंदही ते घेतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Eknath Shinde Birthday
CM Eknath Shinde Birthday : मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना कुटुंबीयांचीही काळजी घेणारे एकनाथ शिंदे!

एकनाथ शिंदे यांच्याकडे पाच हेक्टर म्हणजेच १२.४५ एकर जमीन आहे. ही जमीन एकनाथ शिंदे, त्यांचे भाऊ प्रकाश, सुभाष आणि बहीण सुनीता यांच्या नावावर आहे. गावाकडचे अनेक लोक मुंबईत असल्यामुळे गावाकडची शेती वाट्याने गावातीलच एखाद्या व्यक्तीला करायला सांगतात. मात्र, सुगीच्या दिवसांत कामाला लोक मिळत नाहीत. सुरुवातीच्या पावसानंतर भातलावणी सुरू होते. त्यामुळे वाट्याने शेती करणाऱ्या वारंगुळदाराने भातलावणीला येणार असाल तर शेती करतो, अशी अट घातलेली असते. त्यामुळे मुंबईत असणारे अनेक लोक भातलावणी, काढणी आणि पेरणीच्या वेळेला गावाला जातात. जसे सणांसाठी गावाला जातात तसेच ते सुगीसाठीही गावाला जातात. (EKnath Shinde)

CM Eknath Shinde Birthday
Eknath Shinde Birthday: ठाणेकरांचे 'भाई' बनले राज्याचे मुख्यमंत्री

त्याचप्रमाणे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर व प्रत्येक सुगीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आपल्या दरे गावाला येतात आणि शेतीच्या कामात रमतात. एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि कुटुंबीय भाताची रोपे काढणे, लावणी करणे आणि मशागतीच्या कामांसाठी गावाला येतात. तेथे एकनाथ शिंदे हे स्वतः गुडघाभर चिखलात भातलावणी करतात. त्यासाठी त्यांनी चिखलीसाठी लहान ट्रॅक्टरही घेतला आहे. त्याच्या साह्याने चिखलणी करतात. या तांबड्या मातीत रमताना राजकारणाच्या सर्व गोष्टी विसरून काम करतात आणि घामही गाळतात. भातलावणीनंतर येणाऱ्या गणेशोत्सवातही ते गावी येऊन गावकऱ्यांसोबत सहभागी होतात. त्याबरोबरच दिवाळी सण आणि यात्रेसाठीही गावाकडे येतात. ज्या ज्यावेळी ते गावी येतात, त्यावेळी ते तेथील प्रत्येक क्षण शेतात घालवतात. शिंदे कुटुंबीय स्ट्रॉबेरीची लागवडही करतात. घरातील प्रत्येक सदस्य स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मदत करत असतो. (Eknath Shinde Birthday News)

मुख्यमंत्र्यांच्या शेतीत सर्व प्रकारची फळे, भाजीपाला तसेच औषधी वनस्पतीही आहेत. यामध्ये आंबा, चिकू, काजू, फणस, सफरचंद, अगारुड, चंदन, रक्त चंदन, आवळा, पेरू, मोसंबी, संत्री, स्ट्रॉबेरी, तुती, तसेच गवती चहासह इतर झाडेही आहेत. त्यांच्याकडे गायी, वासरेही आहेत. घरी आले की पहिल्यांदा आपल्या गायीच्या गोठ्यात जाऊन गायींच्या पाठीवरून मायेने हात फिरवतात. त्यांना चारा खाऊ घालतात; मग शेतात जातात. शेतात जाण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक गाडी घेतली आहे. त्यामध्ये किमान सहा ते सात माणसे सहज बसून शेतात जाऊ शकतात. त्यांच्या शेतात शेततळे असून, त्यामध्ये त्यांनी मत्स्यपालनही केले आहे. या तळ्यात चिलापी, रूपचंद, मांदेशी आदी जातींच्या माशांची पैदास होते. अशा प्रकारचे शेततळे गावातील लोकांनाही त्यांनी करायला भाग पाडले आहे. त्यातून या लोकांची आर्थिक उन्नती साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. गावातील इतर शेतकऱ्यांसाठीही त्यांनी विविध योजना राबवल्या आहेत.

CM Eknath Shinde Birthday
CM Eknath Shinde Birthday : ..अरे, प्रभाकर कुठे आहेस? सचिन जोशी बघ काय करतोय?

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com