CM Eknath Shinde Birthday : मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना कुटुंबीयांचीही काळजी घेणारे एकनाथ शिंदे!

Happy Birthday CM Eknath Shinde : नातवाचा चेंडूचा हट्ट पुरवण्यासाठी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून दुकानात गेलेले एकनाथ शिंदे..!
Eknath Shinde Birthday
Eknath Shinde Birthday Sarkarnama

Happy Birthday CM : एक व्हीव्हीआयपी व्यक्ती नातवाला घेऊन रस्त्याकडेच्या दुकानात गेलेली असते. त्यामुळे तेथे प्रचंड गर्दी उसळते. एक आवाज दिला की अख्खे दुकान घरी येईल, इतके वजन असलेली ही व्यक्ती दुकानात का गेली असेल, असा प्रश्न गर्दीला पडलेला असतो... ते असतात आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे! नातवाचा चेंडूचा हट्ट पुरवण्यासाठी ते सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून दुकानात गेलेले...!

माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या हक्काच्या, मायेच्या लोकांच्या सहवासात राहणे त्याला सुरक्षित वाटते. हे हक्काचे लोक म्हणजे आपले आई-वडील, पत्नी, मुलं, नातवंडं आणि अर्थातच आपलं घर. प्रत्येकासाठीच आपलं घर ही सगळ्यात मोठी सुरक्षित जागा असते. त्यामुळे काही दिवस बाहेर राहिल्यानंतर कधी आपण आपल्या घरी जातो, असं होऊन जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तरी याला अपवाद कसे असतील? कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कसा झाला, हे सर्वांनीच पाहिलं, वाचलं आणि ऐकलं आहे. मात्र, पूर्ण वेळ राजकारण आणि समाजकारण करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुसरे रूपही आहे... ते कुटुंबवत्सल आहेत. आपल्या नातवासोबतचे मुख्यमंत्री शिंदे यांचे फोटो वारंवार व्हायरल होत असतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde Birthday
CM Eknath Shinde Birthday : ..अरे, प्रभाकर कुठे आहेस? सचिन जोशी बघ काय करतोय?

मुख्यमंत्री शिंदे पूर्वी ठाण्याच्या किसननगर येथे राहायचे. आधी चाळीत राहणारे मुख्यमंत्री किसननगरची शिवसेना शाखा सांभाळत व्यवसाय, काही दिवस नोकरी करत होते. या वेळी ते त्यांच्या पत्नी, मुलं, आई-वडील, भाऊ, वहिनी यांच्यासमवेत राहायचे. महाविद्यालयीन जीवनात चाळीतील आजूबाजूच्या मित्रमंडळींना घेऊन क्रिकेट खेळणं, फिरायला जाणं या गोष्टी त्यांनीही केल्या आहेत. त्यांच्या चाळीतील मित्रांच्या या आठवणी अद्यापही ताज्या आहेत. त्यानंतर ठाणे शहरात रिक्षाचालक म्हणून काम करताना ते शिवसेनेचे नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. याचवेळी त्यांचं लग्न झालं. घर प्रपंच, शाखा, आनंद दिघे यांच्या टेंबी नाक्यावरील कर्यालयालाही त्यांनी घरच मानलं. कार्यकर्त्यांची उठबस त्यांच्याही घरी सुरू झाली.

सगळं सुरळीत सुरू असताना त्यांच्या आयुष्यात एक दुःखद प्रसंग घडला. हा प्रसंग त्यांच्या आयुष्याला आणखी कलाटणी देऊन गेला आणि समाजाच्या सेवेत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. या वेळी लताताईंनीही स्वतःला सावरत मुख्यमंत्र्यांच्या समाजकारणात स्वतःला गुंतवून घेतलं. धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यांना महापालिकेत घेतलं. त्यानंतर त्यांनी चाळीतील घर सोडून जवळच्या किसननगर येथे इमारतीत घर घेतलं. या वेळीही कार्यकर्ते आणि मित्रांची उठबस त्यांच्या घरी असे. त्यांना काय हवे, नको हे लता वहिनी आनंदाने पाहायच्या. त्यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, ते आमदार झाले. त्यांच्या कामाचा सपाटा कायम वाढतच गेला, पण घरी असलेल्या म्हाताऱ्या आई -वडिलांची काळजी घेणे, लता वहिनींना त्यातल्या त्यात वेळ देणे, पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंचे लाड पुरवण्यात ते कुठेही कमी पडले नाहीत.

शिवसेनेत त्यांचं मोठे स्थान होतं. त्यानंतर त्यांनी 40 आमदारांना घेऊन बंड केलं आणि आता सध्या ते मुख्यमंत्री आहेत. मात्र, या वेळीदेखील त्यांना जसा वेळ मिळेल तसे ते वर्षा बंगल्यावर किंवा ठाण्याच्या बंगल्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत पूजा-अर्चेत रमलेले पाहायला मिळतात. त्यांच्या साताऱ्याच्या दरे या गावीदेखील ते यात्रेनिमित्त पूर्वीसारखेच सहभागी होतात. शेती करतात. शेतात काम करणाऱ्या लोकांची आपुलकीने चौकशी करतात.

सध्या सगळ्यात जास्त वेळ ते नातू, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे पुत्र रुद्रांक्ष याला देतात. एकदा तर चक्क होलीदहन कार्यक्रमाच्या दिवशी ते कुटुंबासोबत किसननगर चाळीत गेले होते. या वेळी त्यांचा नातू रुद्रांक्ष त्यांच्यासोबत होता. या वेळी त्याने दुकानातून चेंडू घेण्याचा हट्ट केला; मग काय मुख्यमंत्री त्याला घेऊन थेट दुकानात गेले. मुख्यमंत्री दुकानातून काय घेत आहेत, ते बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Eknath Shinde Birthday
Eknath Shinde Birthday: ठाणेकरांचे 'भाई' बनले राज्याचे मुख्यमंत्री

गावाला जातानाही रुद्रांक्ष बऱ्याचदा त्यांच्यासोबत असतो. शेतावर आपल्यासोबत त्याला घेऊन जाणं, आपल्या हाताने स्ट्रॉबेरी काढून त्याला ती भरवणं, त्याच्यासोबत खेळणं या सगळ्या गोष्टी ते आवर्जून वेळात वेळ काढून करतात.

घरी पाऊल ठेवलं की सुरुवातीला त्यांचे पाय वडिलांच्या खोलीकडे वळतात. त्यांची ते विचारपूस करतात. सुनेचेही लाड करायला ते विसरत नाहीत. मी राजकारण आणि समाजकारण केलं, पण पत्नी लताने माझं घर सांभाळलं, माझ्या आजूबाजूची माणसं सांभाळली, असे कौतुक करायलाही ते विसरत नाहीत. त्यांच्या सर्व भावांबरोबरही त्यांचे चांगले संबंध आहेत. सर्वांना घर म्हणून बांधून ठेवण्याचे कामही मुख्यमंत्री शिंदे स्वतः करतात.

Eknath Shinde Birthday
Eknath Shinde : रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com