Amol Kolhe News : खासदार कोल्हेंबाबत पुन्हा एकदा चुकचुकली शंकेची पाल; आधी भाजप प्रवेशाची चर्चा अन्...

NCP Political News : कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे...
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या वर्षी भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. याच काळत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा वावड्या उठल्या होत्या. ते काही दिवस विजनवासात गेले होते. त्यामुळे शंका बळावली होती. मात्र, त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत खासदार कोल्हे विजनवासातून बाहेर आले होते. यंदा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही कोल्हे यांच्या भूमिकेबाबत अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या वर्षी सुरू झाली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यातच कोल्हे विजनवासात गेल्यामुळे तशी शक्यता बळावली होती. ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटाच्या निमित्ताने कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या चर्चेच्या आगीत तेल ओतले गेले होते. मात्र, कोल्हे यांच्याकडून स्पष्टीकरण आलेले नव्हते.

Amol Kolhe
Rohit Pawar On Bhujbal:'...पण भुजबळांनी ओबीसी कल्याण खाते सांभाळले नाही'; रोहित पवारांचा टोला

त्याचदरम्यान, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ही संधी साधून कोल्हे विजनवासातून बाहेर आले. त्यांनी राज्यापाल कोश्यारी आणि प्रवक्ते त्रिवेदी यांच्यावर टीकेची झोड उठवत भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. शिवरायांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली होती, असे आक्षेपार्ह वक्तव्य त्रिवेदी यांनी केले होते. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांचीही जीभ घसरली होती. (NCP)

यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. त्यावेळीही कोल्हे यांच्याबाबत शंका निर्माण झाल्या होत्या, कोल्हे शरद पवार यांच्यासोबत राहणार की अजितदादा पवार गटात जाणार हे स्पष्ट होत नव्हते. कोल्हे अजितदादा गटात आले आहेत, असा दावा करण्यात आला होता. दोन-तीन दिवस याबाबत संभ्रम होता. त्यानंतर कोल्हे स्वतः पुढे आले आणि त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हे हे शिरूरचे खासदार आहेत. त्यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. अजितदादा पवारही ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघ युतीतील कोणत्या पक्षाला सुटणार हे अद्याप निश्चित नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा शब्द दिलेला असणार. याचा अंदार घेऊन कोल्हे यांनी राष्ट्रवादीत फुटीच्या दोन-तीन दिवसांनंतर आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले होते. महाविकास आघाडीकडून शिरूरमधून त्यांनाच उमेदवारी मिळणार यात शंका नाही.

Amol Kolhe
Bhandara News : अजितदादांच्या भाषणात घोषणाबाजी करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतलं

कोल्हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे संबध चांगले आहेत. आता शिरूरमधून महायुतीने पाटील यांना उमेदवारी दिली, तर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे कार्यकर्तेही आपल्या विजयासाठी जीव तोडून काम करतील, असा विचार कोल्हे यांनी केला असणार.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com