काँग्रेस सोडणार का? सत्यजीत तांबेंचे भन्नाट उत्तर

Satyajeet Tambe News : सरकारनामाच्या कार्यक्रमात स्पष्ट केली भूमिका
Satyajit Tambe News
Satyajit Tambe NewsSarkarnama
Published on
Updated on

Satyajeet Tambe News : काँग्रेसला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातच आता काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना 'सरकारनामा'च्या कार्यक्रमामध्ये काँग्रेस सोडणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तांबे यांनी स्पष्टच उत्तर दिले.

काँग्रेस सोडणार का? यावर तांबे म्हणाले, काँग्रेस सोडणार नाही. चांगले वाईट दिवस येत असतात. मी संघटनेमध्ये 20 वर्षापासून काम करत आहे. राजकारणात चढ उतार येत असतात. राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे काँग्रेसला फायदा होईल. असे मत 'सरकारनामा ओपन माईक सीजन 2' या कार्यक्रमात सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद, मनसे नेते संदीप देशपांडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनिषा कायंदे उपस्थित होत्या.

Satyajit Tambe News
मोठी बातमी : ‘विनायक मेटेंच्या निधनानंतर शिंदे गटाकडून शिवसंग्राम फोडण्याचा प्रयत्न’

या वेळी या कार्यक्रमात ईडी चौकशीची फेरी घेण्यात आली. त्यामध्ये ईडी म्हणजे 'ईकडचा डॉन' असा त्याचा अर्थ होता. मात्र, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी त्याचा अर्थ शिंदे-फडणवीस सरकार असा लावला. याच अर्थाला पकडून राष्ट्रवादीच्या मिटकरींनी तांबेंची फिरकी घेतली. या चौकशीच्या वेळी मिटकरींनी तांबेंना खोचक प्रश्न विचारला. भाजप किंवा शिंदे गटात जाल का?

प्रश्नावर राजकारणात कसलेल्या तांबे यांनीही तसेच भन्नाट उत्तर दिले. ते म्हणाले, मी भाजप किंवा शिंदे गटात जाणार नाही. मात्र, त्यांना जर मला मदत करायची असेल तर ते करु शकतात. मला ईकडे (म्हणजे काँग्रेस मध्ये) राहुनही ते संधी देऊ शकतील. 'ईडी'ने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मदत करावी, असे तांबे म्हणाले.

तसेच देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर ते एक तरुण मुख्यमंत्री होते. मात्र, फडणवीस यांना या सरकारमध्ये किती स्कोप आहे, असा सवला करत त्यांनी चिमटा काढला.

Satyajit Tambe News
पुन्हा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात लढणार का? दिपाली सय्याद यांनी स्पष्टच सांगितले

'सरकारनामा'चा विशेष कार्यक्रम 'ओपन माईक सिजन 2' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात नेत्यांनी एक मेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली. तर हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना चांगलेच चिमटेही काढले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com