Nana Patole News : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi),आणि प्रियंका गांधी या भावा-बहिणीच्या नात्याचे प्रेम सर्वश्रृत आहे. या दोघांच्या नात्यामधील व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तसाच एक अनुभव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी 'सरकारनामा'च्या मुलाखतीमध्ये सांगितला.
नाना पटोले यांनी 'सरकारनामा'ला रविवारी मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याविषयी बोलताना डोळ्यात अश्रू तरळले. यावेळी पटोले यांना ‘रॅपिड फायरम’ध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. नाना पटोले यांच्यासाठी कोण महत्त्वाचे आहे. राहुल की प्रियंका गांधी त्यावर पटोले म्हणाले, गांधी कुटुंबीय माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
राहुल गांधी, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि सोनिया गांधी हे सगळेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. असे सांगतानाच त्यांनी राहुल आणि प्रियंका यांच्या नात्यातील एक भावनिक अनुभव सांगितला. पटोले म्हणाले, ‘‘भारत जोडो यात्रेसाठी मी नांदेडला गेलो होते. तेथे एक हॉटेलवाला होता. तो अतिशय सुंदर जेवण बनवत होता. भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आल्यानंतर मी राहुल गांधी यांच्यासोबत चालत असताना तो हॉटेलवाला यात्रेत दिसला. तो राहुल गांधी यांना भेटायचे म्हणत होता.’’
मी राहुल गांधी यांना म्हणालो, ‘‘त्या व्यक्तीला आपल्याला भेटायचे आहे. ते हॉटेल व्यवसाईक आहेत, ते रुचकर जेवण बनवतात. तेव्हा राहुलजी म्हणाले त्यांना बोलवा, मी त्यांना बोलावले. राहुलजी त्या व्यक्तीला म्हणाले, तुम्हाला कोणते जेवण बनवता येते. त्यावर त्या व्यक्तीने सांगितले मला महाराष्ट्रीयन आणि पंजाबी जेवण बनवता येते, त्यावर राहुल गांधी यांनी विचारले तुम्हाला छोले भटुरे बनवता येतात का? माझ्या बहिनीला छोले भटुरे खुप आवडतात. त्यामुळे मला ते बनवायला शिकायचे आहे. हा अनुभव सांगत असताना पटोले यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.’’
पटोले म्हणाले, ‘‘मला गांधी घराण्याने खुप प्रेम दिले. बहिणीला एखादी गोष्ट आवडते म्हणून ती मला शिकायची आहे, अशी इच्छा राहुलजी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये चालत असताना व्यक्त केली, हे खुप महत्त्वाचे आहे. त्यामुळे माझ्यासाठी गांधी घराने खुप महत्त्वाचे आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले.’’
नाना पटोले यांनी या मुलाखतीमध्ये काँग्रेसमधील (Congress) कथित अंतर्गत वाद, सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी ते ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची नाराजी, तसेच कसबा पोटनिवडणूक यांच्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक गोप्यस्फोटही केले. विधानसभा अध्यक्ष ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक विषयावर त्यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट उत्तरे दिली.ही मुलाखत लवकरच ‘सरकारनामा’वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.