न्यायालयाने आज आम्हाला न्याय दिला : देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

कथित शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला आहे.
Anil Deshmukh-Supriya Sule-Amol Mitkari
Anil Deshmukh-Supriya Sule-Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सत्यमेव जयते...! सत्याचा अखेर विजय झाला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खोटेनाटे आरोप झाले होते. मात्र, न्यायालयाने आज आम्हाला न्याय दिला आहे. न्यायालयाचे खूप खूप आभार...अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांना ईडीकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. (Court gave us justice today: Supriya Sule's reaction to Anil Deshmukh's bail)

कथित शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, ईडीच्या खटल्यात देशमुख यांना जामीन मंजूर झाला असला तरी ते अजूनही सीबीआयच्या खटल्यात कोठडीत आहेत.

Anil Deshmukh-Supriya Sule-Amol Mitkari
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस-नाना पटोले यांच्यात बंद दाराआड खलबतं; चर्चांना उधाण

खासदार सुळे म्हणाल्या की, देशमुख यांना जामीन मिळाल्यामुळे आम्हाला आज न्यायालयाने न्याय दिला आहे. पण, आम्हाला आणखी यापुढेही लढाई लढावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासाठी आम्ही ही लढाई पुढे चालू ठेवू. अडचणीच्या काळात जे जे लोक आमच्यासोबत उभे राहिले, त्या सर्वांचे मी आभार मानते.

Anil Deshmukh-Supriya Sule-Amol Mitkari
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर

देशमुख यांना ईडीच्या खटल्यात जामीन मिळाला असला तरी सीबीआयच्या खटल्यात ते अजूनही कोठडीत आहेत, त्यामुळे त्यांची सुटका होणार नाही, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशमुख यांच्या सुटेकसाठी आम्ही लढत राहू. देशमुख यांनी काही चुकीचे केलेच नाही. आम्हाला आज किंवा उद्या नक्कीच न्याय मिळेल, असा आमचा विश्वास होता. त्यामुळेच मी सत्यमेव जयते, असे म्हणते.

Anil Deshmukh-Supriya Sule-Amol Mitkari
Andheri By-Election ...तर अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला मिळेल : उज्ज्वल निकम

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित हो नही सकता, हे देशमुख यांचा जामीन प्रतीक आहे. देशमुखांना मानसिक, शारीरिक त्रास झाला असेल. त्यांच्या घरच्यांना त्रास झाला असेल पण न्यायव्यवस्था ही न्याय करते. उशिरा का होईना न्यायालयाकडून देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे. पण, अकरा महिन्यांच्या तपासात कुठेही काहीही निष्पन्न झालेले नाही. देशमुखांना आज जामीन मिळाला, लवकरच ते निर्दोष मुक्त होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com