माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर

मनी लाँडरिंगप्रकरणी गेल्या वर्षी अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती.
Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. इडीने देशमुखांच्या जामीनाला विरोध केला होता. मात्र, कोर्टाने काही अटीशर्थींसह देशमुखांचा जामीन मंजूर केला आहे. मनी लाँडरिंगप्रकरणी गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी त्यांना अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर आज तब्बल अकरा महिन्यांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

अनिल देशमुख हे गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना त्याचदिवशी अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरूंगात होते. कर चुकवेगिरी प्रकरणातही देशमुखांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात त्यांच्याविरोधात तब्बल 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; तुरूंगातील मुक्काम वाढला

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर ईडी व सीबीआयने देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला ईडीने त्यांना मनी लाँर्डिंग प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com