सतिश उकेंमुळे फडणवीस अन् बावनकुळे का आलेत अडचणीत?

नागपूरातील वकील सतीश उके यांना गुरूवारी अमलबजावणी संचालनालयाने (ED) सहा तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलं.
Devendra Fadnavis, satish uke, Chandrashekhar Bawankule
Devendra Fadnavis, satish uke, Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : नागपूरातील वकील सतीश उके (Satish Uke) यांना गुरूवारी अमलबजावणी संचालनालयाने (ED) सहा तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अॅड. उके यांनी भाजपच्या (BJP) काही नेत्यांना अडचणीत आणले आहे. त्यामुळे या कारवाईवरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एका जमीन प्रकरणातही उके अडकले असून त्याबाबत कारवाई असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, अद्याप ईडीकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन फौजदारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगापासून लपविली असल्याची याचिका उके यांनी दाखल केली आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ३० ऑक्टोबरपासून साक्षी पुराव्‍यांची तपासणी सुरू करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी ता. १२ ऑक्टोबर दिले आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Devendra Fadnavis, satish uke, Chandrashekhar Bawankule
फडणवीसांच्या विरोधात खटला दाखल करणारे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नागपूर (कोर्ट क्रमांक ३) देशमुख यांनी हा आदेश दिला होता. या प्रकरणाचे साक्षीपुरावे यांची तपासणी ३० ऑक्टोबरपासून सुरू करण्यात यावी. यामध्ये फडणवीस यांना साक्षीदारांची उलटतपासणी करता येईल. याचिकाकर्त्यांचे आरोप सिद्ध झाल्यास या प्रकरणात ६ महिने कैद, १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २०१९ पासून हा खटला सुरू झाला आहे. १२५ अ लोकप्रतिनिधी कायद्यान्वये हा खटला दाखल करण्यात आला आहे. फडणवीस यांच्यावर कलम ४२०, ४६७, ४६८ बदनामी, फसवणूक, कागदपत्रांमध्ये हेराफेरी करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १९९९-२००० मध्ये फडणवीसांनी या प्रकरणात जामीन मिळविला होता. या प्रकरणी आता नागपूर जिल्हा न्यायालयात साक्षी आणि पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. माहिती लपवण्याविरोधात फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी उके यांनी केली आहे.

Devendra Fadnavis, satish uke, Chandrashekhar Bawankule
निवडणूक निकालानंतर अखिलेश यांना काकांचा पहिला धक्का; योगींच्या भेटीनं राजकारण तापलं

बावनकुळेंविरोधात गंभीर आरोप

भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) हे पाच हजार कोटींचे मालक आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींचा काळा पैसा आहे. त्यांच्याकडे पाच फ्लॅट व चार महागड्या कार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी त्यांच्याच नातेवाइकांनी केली होती. सूरज तातोडे असे आरोप करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते बावनकुळे यांच्या पत्नीचे भाचे आहेत.

सतीश उके यांनी काही दिवसांपूर्वी सूरज यांना नागपुरात आणून पत्रकार परिषद घेतली होती. चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असताना सूरज तातोडे (Suraj Tatode) हे नागपूर आणि मुंबईतील बंगल्यावर काम करीच होते. कंत्राटदारांकडून मिळालेले भ्रष्टाचाराचे पैसे बावनकुळे सूरज यांच्याकडे देत होते. दोन वर्षांत अंदाजे शंभर कोटींचा काळा पैसा बावनकुळे यांनी ठेवायला दिला, असे तातोडे यांनी पत्रकारांना सांगितले होते यामुळे नागपूरच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. बावनकुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत उके यांच्याविरोधा मानहानीची नोटीसही पाठवली.

Devendra Fadnavis, satish uke, Chandrashekhar Bawankule
आदित्य ठाकरेंच्या दोन शब्दांनी आमदार कदमांना मिळालं बळ; परबांना सूचक इशारा?

गडकरींविरोधातील याचिकेत वकील

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. या प्रकरणी नाना पटोले यांच्या बाजूने सतीश उके हे न्यायालयात बाजू मांडत आहेत. यापार्श्वभूमीवर उके यांच्यावर कारवाई झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

जमीन प्रकरणात उकेंवर गुन्हा

काही दिवसांपूर्वी उके यांच्यावर एका 60 वर्षीय वृध्देने आपल्याला धमकावरून जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. उके यांनी दीड एक जमीन स्वत:च्या व भावाच्या नावावर केल्याचा आरोप वृध्देनं केला होता. काही वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी उके यांना ताब्यात घेतलं होते. त्यांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्यानंतर त्यांच्यावर कुठलाही कारवाई झाली नाही. ईडीने गुरूवारी केलेली कारवाई याच प्रकरणात असावी, अशीही चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com