Devendra Fadnavis Orders BJP Ministers: देवेंद्र फडणवीसांचे भाजप मंत्र्यांना आदेश; 'कामगिरी सुधारा....'

BJP News: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पर्णकुटी बंगल्यावर मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : आपल्याला लोकसभेचे ‘मिशन-४५’ पूर्ण करायचे आहे, त्यासाठी कामगिरी सुधारा. निर्णय घेताना तुम्हाला काही अडचणी असतील, तर मला सांगा. मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिले आहेत. (Devendra Fadnavis orders BJP ministers to improve their performance)

भाजपने (BJP) महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ हे लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) उद्दिष्ठ ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसाला एकदा भाजप मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात येते. त्यानुसार बुधवारी (ता. २८ जून) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पर्णकुटी बंगल्यावर मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्र्यांना सूचना केल्या आहेत. याबाबत एका वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.

Devendra Fadnavis
Fadnavis on kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभेची जागा कोण लढविणार, श्रीकांत शिंदे की भाजप?; फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

भाजपला महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी कामगिरी उत्तमच हवी. सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोचवावेत. निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर आपल्याला सांगावे, अशी सूचनाही फडणवीस यांनी मंत्र्यांना केली आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची कामे प्राधान्यक्रमाने करण्यात यावीत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

Devendra Fadnavis
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमविणं नगरसेवकाच्या अंगलट ; रेशन दुकानाचा परवाना रद्द ; नेमकं काय झालं ?

फडणवीस म्हणाले की, मी कुणाच्याही कामगिरीवर नाराजी नाही. पण, आता कामगिरी अधिक सुधारण्याची गरज आहे. कारण आपल्याला लोकसभा निवडणुकाला सामोरे जाऊन जिंकायच्या आहेत. आपल्याला आगामी काळात जास्तीत जास्त निर्णय घ्यायचे आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांची कामे प्राधान्याने करायची आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आपल्याला जनतेपर्यंत पोहोचव्याचे आहेत. त्यासाठी आक्रमक पद्धतीने काम करावे.

Devendra Fadnavis
Mahadev Jankar : महादेव जानकरांना पुन्हा मंत्रिपदाची आशा; भाजपा काय करणार ?

आपल्याला महाविकास आघाडीचा सामना करायचा आहे, त्यांच्याविरोधात आपल्याला ताकदीने लढावं लागेल. निर्णय घेताना तुम्हाला काही अडचणी असतील, तर त्या मला सांगा. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेन. मात्र, जनतेच्या हिताचे आणि लोकसभा मिशन-४५ च्या अनुंषगाने निर्णय घ्यावे लागतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com