30 September in History : बराक ओबामा अन् नरेंद्र मोदींची भेट; भारत व अमेरिका मैत्रीचे पर्व

Dinvishesh 30 September : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेत बराक ओबामा यांनी भेट घेतली होती. तो दिवस म्हणजे 30 सप्टेंबर 2014...
30 September in History Dinvishesh
30 September in History Dinvishesh Sarkarnama
Published on
Updated on

देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताच काही महिन्यांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा पाच दिवसांचा दौरा केला. अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांचा भारताविषयीचा विश्वास संपादन करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीआधी मोदी ( Narendra Modi ) यांचा न्यूयॉर्कमधील मेडिसन स्केअर मध्ये भारतीयांशी परिसंवाद झाला. त्यावेळी अलोट उत्साहात मोदींचे स्वागत केले गेले. या दौऱ्याचे फलित म्हणजे अमेरिकने व भारताने 'चले साथ साथ' असे पथदर्शी धोरण सादर जाहीर केले.

त्या दिवशी ओबामांनी मोदी यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये डिनरचे आयोजन केले होते. त्याच कार्यक्रमात हे धोरण अमेरिकेने जाहीर केले. तंत्रज्ञान, सुरक्षा सहकार्य, जागतिक शांती आणि समृद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दहशतवादाशी एकत्र लढा या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचा निर्धार या धोरणा व्यक्त करण्यात आला होता.

तो दिवस होता आजच्या तारखेचा पण दहा वर्षांपूर्वीचा म्हणजेच 30 सप्टेंबर 2014...

narendra modi meet barack obama
narendra modi meet barack obamasarkarnama

दिनविशेष - 30 सप्टेंबर

1993 : मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा, किल्लारी व औसा परिसरात भीषण भूकंप. आठ गावे भुईसपाट झाली. वीस हजारांपेक्षा जास्त लोक ठार तर दहा हजार लोक जखमी झाले.

30 September in History Dinvishesh
29 September in History : भाजप अन् शिवसेनेत मनभेदाचे पडले पुढचे पाऊल!

1998 : भूदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.

1998 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील सेंद्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना "शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कार जाहीर.

30 September in History Dinvishesh
28 September in History : युती नक्की कुणी तोडली..दहा वर्षांनीही प्रश्न कायमच?

2001: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव जिवाजीराव शिंदे यांचे विमान अपघातात निधन.

2004 : हैदराबाद मुक्तिसंग्रामातील धुरंधर, लढवय्ये आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विजयेंद्र काबरा यांचे निधन. गेली पासष्ट वर्षे मराठवाड्याच्या विकासासाठी झटणारे, कामगार - सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर लढणारे रोखठोक व्यक्तिमत्त्व म्हणून काबरा सर्वपरिचित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com