29 September in History : भाजप अन् शिवसेनेत मनभेदाचे पडले पुढचे पाऊल!

Dinvishesh 29 September : स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. प्रमोद महाजन यांनी सुमारे 25 वर्षे एकसंध ठेवलेली शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तुटली. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थिती केलेल्या प्रश्नानंतर उद्धव ठाकरेंनी 29 सप्टेंबर 2014 ला मोठं पाऊल उचललं.
28 September in History Dinvishesh
28 September in History Dinvishesh Sarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रात 2014 मध्ये निवडणुका लागल्या आणि 25 वर्षांचे साथी असलेल्या भाजप-शिवसेनेत दरी पडली. या निवडणुका स्वबळावर लढण्याचे दोन्ही पक्षांनी ठरवले.

याच काळात युती तुटल्याचीही घोषणा झाली. त्यावेळी केंद्रात भाजपला शिवसेनेचा पाठिंबा होता. शिवसेनेचा अपमान झालेला असताना त्यावेळी केंद्रात अवजड उद्योग मंत्री असलेल्या अनंत गितेंनी राजीनामा का दिला नाही, अशी जाहीर विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.

अखेर उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) निर्णय घेतलाच आणि दहा वर्षांपूर्वी 29 सप्टेंबरच्याच दिवशी अनंत गिते राजीनामा देतील, अशी घोषणा केली.

29 September 2024 dinvishesh.jpg
29 September 2024 dinvishesh.jpgsarkarnama

आजचे दिनविशेष

1725 : भारतात ब्रिटिश सत्ता दृढ करणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड रॉबर्ट क्‍लाईव्ह यांचा जन्म.

1925 : फ्रान्सचे पंतप्रधान व नोबेल पुरस्काराचे मानकरी लिआँ व्हीक्तॉर ऑग्यूस्त बूर्झ्वा यांचे निधन. त्यांनी प्राप्तिकर, निवृत्तिवेतन, सामाजिक सुरक्षा, विमा योजना इत्यादींबाबत पुरोगामी धोरणाचा पुरस्कार केला. 1919 मध्ये पॅरिस येथे भरलेल्या शांतता परिषदेतही त्यांनी फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले व जागतिक शांततेचा पुरस्कार केला. या कार्याबद्दल 1920 चा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला.

28 September in History Dinvishesh
28 September in History : युती नक्की कुणी तोडली..दहा वर्षांनीही प्रश्न कायमच?

1932 : मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व साहित्यिक हमीद दलवाई यांचा जन्म.

1952 : शिर्डी येथील साई मंदिराच्या कळसाची प्रतिष्ठापना डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या हस्ते.

28 September in History Dinvishesh
27 September in History : इथपासूनच झाली महाराष्ट्राच्या अस्थिर राजकारणाची सुरुवात

1966 : नामवंत कायदेपंडित, मद्रासचे कायदामंत्री, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेले सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचे निधन. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेत सभासद या नात्याने त्यांनी काम केले. त्रावणकोर, अन्नमलई व बनारस विद्यापीठांचे ते कुलगुरू होते.

1997 : "इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट' (आयआरएस-1 डी) या भारतातील पहिल्या अतिप्रगत दूरसंवेदक उपग्रहाचे "पीएसएलव्ही-सी 1' या ध्रुवीय उपग्रह वाहकाद्वारे श्रीहरिकोटा येथील शार तळावरून यशस्वी प्रक्षेपण.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com