मोठी बातमी : जळगावमधील दोन बंडखोर आमदार मंत्रिपदासाठी गुवाहाटीमध्येच भिडले?

हा वाद नेमका कोणत्या दोन बंडखोर आमदारांमध्ये वाद झाला आहे, याचा उल्लेख मात्र त्यामध्ये केलेला नाही.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडानंतर अनेकांना मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. ही स्वप्ने जशी राज्यातील आमदारांना पडत आहेत, तशी ती बंडात सामील असलेल्या गुवाहाटीमधील आमदारांनाही पडणे स्वाभाविक आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील शिवसेनेचे (shivsena) दोन बंडखोर आमदार हे मंत्रिपदावरून (minister Post) गुवाहाटी येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये भिडल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. (Dispute between two rebel MLAs in Jalgaon district over ministerial post?)

Eknath Shinde
एकनाथ शिंदेंचं बंड पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद मिळवून देणार?

गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांच्या चर्चा तसेच संवाद सोशल मीडियावर सुरू आहे. सांगोला येथील आमदार शहाजी पाटील यांचा संवाद राज्यात सर्वात जास्त गाजतो आहे. त्याचे दाखले अनेक नेते आपल्या भाषणातून देऊन त्यांची खिल्ली उडवत आहेत. त्यातच आता या पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांमध्ये वाद सुरू झाल्याची चर्चाही हळूहळू बाहेर येत आहे.

मंत्रिपदावरून आसामात राडा...कोण होणार मुंबईत परतल्यावर मंत्री.... या मुद्द्यावरून जळगाव जिल्ह्यातील दोन आमदार एकमेकांशी भिडले आहेत. पार हातापाई झाली आहे, सूत्रांची माहिती. अशी एक पोस्ट सध्या जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या पोस्टवरून जळगाव जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या दोन बंडखोर आमदारांमध्ये वाद झाला आहे, याचा उल्लेख मात्र त्या पोस्टमध्ये केलेला नाही. त्या मुळे याची सत्यता काय आहे, हे मात्र कळू शकलेले नाही. ॲड. जयेश वाणी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही पोस्ट केलेली आहे. ॲड वाणी हे जळगाव जिल्ह्यातील नव्हे; तर पुणे येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.

Eknath Shinde
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल!

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, पारोळा येथील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील, चोपडा येथील आमदार लता सोनवणे आणि मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील (निवडून आल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला आहे.) आदींनी बंडखोरी करत शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. आता यामध्ये कोणत्या दोन बंडखोर आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी अगोदरच वाद झाले हे मात्र गुवाहाटीमधील आमदारांनाच माहित असावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com