
India Union Budget Beneficial for America : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26साठी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. अर्थसंकल्पीय घोषणांमुळे सर्वसामान्य, शेतकरी वर्गासह व्यावसायिक आनंदी झाल्याचे दिसत आहे. विशेषकरून मध्यवर्गीय नोकरदारांसाठी यंदाचा अर्थसंकल्प मोठी भेट घेवून आला होता, कारण या अर्थसंकल्पातून आयकरात मोठी सूट मिळाली आहे.
याशिवाय कस्टम ड्यूटीमध्ये कपात करत अनेक वस्तूंच्या किंमती कमी केल्या आहेत. तर अर्थसंकल्पात काही कच्चा मालावरील शुल्कात कपात केल्याने निर्यात आणि पुर्नउत्पादन वाढेल. याचा फायदा अमेरिकेलाही(USA) होणार आहे. त्यामुळेच यंदाच्या भारतीय अर्थसंकल्पावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खूश असल्याचंही समोर येत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात अशी काही घोषणा केली, की ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चांगलेच खूश होवू शकतात. कस्टम ड्यूटी कमी करण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेतून होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होईल. कस्टम ड्यूटीचा अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या संशोधन संस्थेच्या मते, मोटारसायकली आणि चव वाढवणाऱ्या कृत्रिम घटकाच्या उत्पादनांवर अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या सीमाशुल्क कपातीचा फायदा अमेरिकन निर्यातदारांना होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) नेहमीच टॅरिफ किंग म्हणून भारतावर टीका करतात, परंतु अर्थसंकल्पात अनेक उत्पादनांवरील शुल्कात लक्षणीय कपात करून अमेरिकेच्या निर्यातीला चालना मिळाली आहे. अर्थंसकल्पातील या घोषणेनंतर ट्रम्प यांच्या दृष्टिकोन बदलेले अशी अपेक्षा आहे.
वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अर्थसंकल्पात सागरी उत्पादने, रसायने आणि महत्वाची खनिजे यासारख्या क्षेत्रातील काही कच्चा मालावरील सीमाशुल्कात कपात केल्याने देशांतर्गत उत्पादन आणि निर्यातीला चालना मिळेल. तसेच मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, मॉडेल द्विपक्षीय गुंतवणूक करार(BIT) मध्ये सुधारणा करण्याच्या घोषणेमुळे FTA(मुक्त व्यापार करार) चर्चेच्या दरम्यान चांगली परिस्थिती निर्माण होईल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.