Eknath Shinde News : अजितदादांच्या जागांवर शिंदे शिवसेनेचा डोळा ? 'या'आठ ठिकाणी नेमले निरीक्षक, भाजपच्या जागा सोडल्या

Political News : दोन दिवसांपूर्वी 113 विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली. हे करत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून निरीक्षक नेमण्यात आले आहेत, त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
Mahayuti Leader
Mahayuti LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांने सुरु केली आहे. महायुती व महाविकास आघडीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता एकमेकांच्या जागांवर आतापासूनच लक्ष ठेवले जात असल्याने येत्या काळात रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे.

विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजितदादा) या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 100 जागांवर दावा सांगितला आहे. मात्र, हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 80-80 जागांवर तडजोड करतील. तर, भाजप (BJP) 160 जागा लढविणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अमित शाह यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असे सांगितले जात असले तरी दोन दिवसांपूर्वी 113 विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली. हे करत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून (Shivsena) निरीक्षक नेमण्यात आले आहेत, त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. (Mahayuti News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शनिवारी 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली. यासोबतच शिवसेना विधानसभा निवडणुकीत 288 पैकी किमान 100 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचा संदेशही शिंदे यांनी मित्रपक्ष भाजप व अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असल्याने त्यांनी निरीक्षक नियुक्त करून बाजी मारली आहे.

शिवसेना शिंदे गटाने विधानसभा मतदारसंघावर निरीक्षक नियुक्त करताना महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघावर निरीक्षक नेमण्यात आले आहेत. दुसरीकडे मात्र मित्रपक्ष असलेल्या भाजपकडे असलेल्या एकाही मतदारसंघात शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली नसल्याने येत्या काळात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

Mahayuti Leader
Aditya Thackeray News : नोव्हेंबरमध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल; त्यानंतर... आदित्य ठाकरेंचा महायुतीला इशारा

शिवसेना शिंदे गटाने अजितदादांचे आमदार असलेल्या निफाड - गिलीप बनकर, ⁠दिंडोरी - नरहरी झिरवाळ, ⁠जुन्नर - अतुल बेनके, ⁠खेड आळंदी - दिलीप मोहिते, ⁠शहापूर - दौलत दरोडा, ⁠अणुशक्तीनगर - नवाब मलिक, ⁠देवळाली - सरोज अहीरे, ⁠वसमत - चंद्रकांत नवघरे या मतदारसंघावर शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आतापासूनच शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात जागावाटपावेळी दोघांकडून या जागेवर दावा करण्यात येणार असल्याने या मतदारसंघावरून रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे.

दुसरीकडे भाजपकडे असलेल्या एकाही मतदारसंघात शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेना व भाजपकडून हे ठरवून केले जात नाही ना अशी चर्चा रंगली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 126 तर भाजपने 162 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे याच फॉर्म्युल्यानुसार भाजप-शिवसेनेकडून तयारी केली जात आहे का ? याची चर्चा सुरू झाली आहे.

Mahayuti Leader
Congress News : लोकसभेचा स्ट्राइक रेट कायम ठेवणार; 'हायकमांड'च्या आदेशानंतर काँग्रेस करणार इतक्या जागांवर दावा

महायुतीमध्ये रंगणार घमासान

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 100 हून अधिक जागा लढवण्याची तयारी केली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही 85 ते 100 जागांवर दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीतील ‘मोठा भाऊ’ म्हणवून घेणारा भाजप नेमक्या किती जागा लढविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीमध्ये जागावाटपावरून घमासान रंगण्याची शक्यता आहे.

Mahayuti Leader
Shiv Sena: महायुतीचं टेन्शन वाढलं; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचे विधानसभेवरून वक्तव्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com