फडणवीस नाराज दिसत होते, हे शरद पवारांच्या नजरेेनेही टिपले..

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री बनण्यास तयार नव्हते, असा पवार यांचा दावा
 Devendra Fadnavis, Sharad Pawar Latest News
Devendra Fadnavis, Sharad Pawar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा सरकारमध्ये परतल्याने त्याविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शपथ घेतली. या शपथविधीच्या वेळी देवेंद्र फडणवीस नाराज होते, हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही लक्षात आले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आपले निरीक्षण टिपले. वरून आदेश आल्याने त्यांना हे पद स्वीकारावे लागले, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.

 Devendra Fadnavis, Sharad Pawar Latest News
Maharashtra Politics Live : शिंदे मध्यभागी, बाजूला फडणवीस आणि मुख्य सचिव : पहिली कॅबिनेट संपली

पवार म्हणाले की शरद पवार मुख्यमंत्री राहिलेली शंकरराव चव्हाण हे नंतर माझ्या मंत्रीमंडळात मंत्री राहिले होते. त्यानंतरच्या काळात मुख्यमंत्री झालेले शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सुशीलकुमा शिंदे यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तरी त्यांनी नंतर मंत्री म्हणून काम पाहिले. पण फडणवीस यांनी नंबर दोनची जागा का स्वीकारली का, हे कळत नाही. ते खूष नाहीत, हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण त्यांना त्यांच्या पक्षाचा आदेश आला आहे. ते मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. त्यांच्यावर आदेश पाळण्याचे संस्कार आहेत. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले असावे.

 Devendra Fadnavis, Sharad Pawar Latest News
मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की...

एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. माझ्यासह साताऱ्याचे पाच मुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लाॅटरी लागली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण त्यांनाही उपमुख्यमंत्रीपदाची अपेक्षा असावी, असेही पवार यांनी सांगितले. मी पुन्हा आलो असं म्हणणारे वाटतं नाही की ते परत आले आहेत. लोकांमधून इच्छा संपादन करून स्वच्छ निवडून बहुमतात आले असते तर मी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या असत्या, असेही पवारांनी सांगितले.

सरकार किती काळ टिकेल, याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की ते सांगायला मी ज्योतिष नाही. उद्या जेव्हा मंत्रीमंडळ तयार होईल तेव्हा त्यावर भाष्य करता येईल. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या टिकेविषयी विचारले असता तुम्ही अशा लोकांना का महत्व देता, असा प्रतिसवाल पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com