MVA News : महाविकास आघाडीत जागा वाटपाचा खेळ; 'मोठ्या भावा'चा मात्र लागेना मेळ !

NCP, Congress and Shivsena : आरोप प्रत्यारोप होत असले तरी एकत्रच लढण्यावर तीनही पक्ष ठाम
Ajit Pawar, Sanjay Raut, Nana Patole
Ajit Pawar, Sanjay Raut, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाराष्ट्रात आता निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडीला लोकसभेत ३४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली होती. दरम्यान, कर्नाटक राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे.

आघाडीतील घटक पक्षांत मात्र जागा वाटपावरून कलगीतुरा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीत आपणच 'मोठा भाऊ' असा दावा करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा 'खेळ' सुरु झाल्याची टीका सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. तर जागा वाटपावर चर्चाच झाली नसल्याने अद्यापतरी 'मोठा भावा'चा मेळ लागला नाही.

Ajit Pawar, Sanjay Raut, Nana Patole
Mp Hemant Patil On Gadkari : गडकरी पंतप्रधान व्हावेत, शिंदे गटाच्या खासदाराची इच्छा..

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सध्याच्या आमदारांची संख्या पाहिली तर आम्हीच मोठा भाऊ आहोत, असा दावा केला आहे. ते म्हणाले की, यापूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त असल्याने प्रत्येक निवडणुकीत जागा वाटप करताना राष्ट्रावादी काँग्रेसला लहान भावाची भूमिका घ्यावी लागली. आता मात्र काँग्रेसच्या ४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे."

अजित पवारांच्या या विधानाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी समर्थन केले.रोहित पवार म्हणाले, "अजितदादा आकड्यांवर बोलतात. राष्ट्रवादीचा आकडा आजही काही पक्षांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा भाऊ बोलणे योग्य आहे. मात्र जेव्हा आपण मोठा भाऊ म्हणतो तेव्हा ती व्यक्ती आपण मार्गदर्शक समजतो. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार मोठे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे मोठा भाऊ राष्ट्रवादीकडेच आहे. आता याचा अर्थ असा नाही की आम्ही जास्त जागा मागणार किंवा कमी मागणार. मात्र राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे असे म्हणणे योग्य आहे."

Ajit Pawar, Sanjay Raut, Nana Patole
Makai Sugar Factory : बागलांकडून विरोधकांचा 'करेक्ट कार्यक्रम' : मकाई कारखाना बिनविरोध होण्याच्या मार्गावर?

अजित पवारांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पटलवार केला. ते म्हणाले, शिवसेना-भाजपा युतीमध्ये मोठा भाऊ कोण यावर चर्चा होत होती. त्यावेळी मी 'डीएनए टेस्ट' करावी लागेल, असे म्हटलो होतो. त्यानुसारच आता महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण अशी चर्चा सुरू आहे. आताही सगळ्यांची 'डीएनए टेस्ट' करावी लागेल. प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची भूमिका मांडत आहे. लोकसभेच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आधी लोकसभेची निवडणूक होईल, मग विधानसभेची होईल."

अजित पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मात्र जास्त बोलणे टाळले. पटोले म्हणाले, " काँग्रेसची भूमिका कायमच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. ती आमची परंपरा आहे. यापूर्वी आमच्या जागा जास्त होत्या. त्यावेळी आम्ही कधी गर्व केला नाही. आता त्याचा गर्व कुणी करावा हा ज्यांचात्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर जास्त बोलणे उचित ठरणार नाही."

Ajit Pawar, Sanjay Raut, Nana Patole
Uday Samant News : वेदांता फॉक्‍सकॉनची श्‍‍वेतपत्रिका काढणार...उदय सामंत

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मावरच बोट ठेवले. ते म्हणाले, "कोण मोठा कोण लहान भाऊ या चर्चांतून महाविकास आघाडीत कुठल्याही प्रकारची बिघाडी होणार नाही. मूळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या उदरातून झाला आहे. आता आम्ही तिघेही राज्यातील कायदा सुव्यवस्था, लोकशाही आबाधीत राखण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून महाविकास आघाडीत (MVA) मोठा कोण आणि लहान कोण यावर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. हे करताना मात्र तीनही पक्षांतील नेत्यांनी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. आगामी निवडणुका एकत्र राहुनच लढणार असल्याचे दावे केले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com