Congress Politics : हर्षवर्धन सपकाळांच्या मदतीसाठी 'ते' परत आले, काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन येणार?

Ganesh Pati Extends Support to Harshvardhan Sapkal : गणेश पाटील यांचा शांत स्वभाव अन् शिस्त तर जुन्या ६०, ७०च्या दशकातील काँग्रेसची! गेली काही वर्षे मुंबईतील त्यांचा वावर काहीसा कमी झाला होता. ते त्यांच्या गावी बुलडाण्यात रमले होते.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal Sarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे. सपकाळ यांनी संघटनात्मक बांधणीला महत्व देत पुन्हा कार्यकर्त्यांना पुन्हा काँग्रेसशी जोडायली सुरुवात केली आहे. आपल्या टीममध्ये सपकाळ नवीन आणि जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांचा समतोल साधताना दिसत आहे. विशेष म्हणजे खास काँग्रेस वळणाचे असलेले विदर्भातील गणेश पाटील सपकाळांच्या टीममध्ये आल्याने काँग्रेसच्या पडत्या काळात पुन्हा उभारीसाठी ताकद मिळणार आहे.

विदर्भातील गणेश पाटील काँग्रेसचे जुनेजाणते, महत्त्वाचे नेते आणि खरे तर अत्यंत बुद्धिमान, तळमळीचे कार्यकर्ते. संपूर्ण राज्याची माहिती तोंडपाठ. पक्षाने पुढे जावे यासाठी निष्ठावंतांशी सतत संपर्क ठेवून त्यांना कामात ओढणारे पाटील हे कोणत्याही पक्षाला अभिमान वाटावेत असे बॅकरूमबॉय. माणिकराव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना गणेश पाटील पक्षाची कार्यालयीन बाजू सांभाळत विस्ताराकडे लक्ष ठेवण्यासाठी आठवड्यातील चार दिवस मुंबईतील टिळक भवनात बसून असत.

Harshwardhan Sapkal
Success Story: 25 वर्षांपूर्वी कचऱ्याच्या पेटीत सापडली होती... अमरावतीच्या शंकरबाबांची लेक झाली कलेक्टर ऑफिसमध्ये अधिकारी

गणेश पाटील यांचा शांत स्वभाव अन् शिस्त तर जुन्या ६०, ७०च्या दशकातील काँग्रेसची! गेली काही वर्षे मुंबईतील त्यांचा वावर काहीसा कमी झाला होता. ते त्यांच्या गावी बुलडाण्यात रमले होते. प्रदेशाध्यक्ष बदलला की चमू बदलते. आता हर्षवर्धन सपकाळ यांची अध्यक्षपदी निवड झाली.

गणेश पाटील यांनीही पुन्हा कार्यालयात यायला सुरुवात करावी, अशी गळ सपकाळ यांनी घातली. दोघेही बुलडाण्यातले. तेव्हा गावच्या अध्यक्षाला त्यांना नाही म्हणवेना. आता पाटील पुन्हा किमान तीन-चार दिवस मुंबईत राहून पक्षाच्या कारभारात लक्ष घालू लागले आहेत. काँग्रेसच्या पडत्या काळात असे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेतच, अन् पक्षाध्यक्षांच्या उपयोगाचेही !

Harshwardhan Sapkal
Pahalgam Terrorist attack : श्रीनगर फिरले, पहलगामला निघाले... तासभर आधीच वाटेतच अडचण आली अन् नाशिकचे आठ जण बचावले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com