Google Investment India : शेतकरी अन् रुग्णांसाठी गुगलचं मोठं 'गिफ्ट'! भारतात करणार कोट्यवधींची गुंतवणूक; काय आहे नेमका प्लॅन?

Google support for Indian farmers and patients : शेतकरी आणि रुग्णांसाठी गुगल भारतात कोट्यवधींची गुंतवणूक करणार आहे. काय आहे गुगलचा नेमका प्लॅन? सविस्तर जाणून घ्या.
Google Investment India
Google Investment IndiaSarkarnama
Published on
Updated on

जगातील आघाडीची टेक कंपनी गुगलने भारतासाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि रुग्णांसाठी थेट फायदा होईल अशा योजना राबवण्यासाठी गुगल भारतात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या मदतीने आरोग्य, शेती, शिक्षण आणि शाश्वत शहरांच्या विकासावर भर देण्याचा कंपनीचा हा मोठा प्लॅन आहे.

गुगलने भारतातील एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्ससाठी तब्बल 8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत देणे आणि शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण बदल घडवणे हे उद्दिष्ट आहे. याशिवाय भारतासाठी स्वतंत्र आरोग्य मॉडेल विकसित करण्यासाठी गुगलने 4 लाख अमेरिकन डॉलर्सची अतिरिक्त मदत देण्याचेही जाहीर केले आहे.

Google Investment India
Rajiv Satav Resignation story : राहुल गांधींसाठी राजीव सातवांनी एका मिनिटांत सोडली होती खासदारकी... त्यांच्याच पत्नीने आता काँग्रेस सोडली!

भारतीय भाषांमध्ये एआय आधारित सेवा अधिक प्रभावी व्हाव्यात यासाठी गुगल Gyani.ai, Corover.ai आणि Bharatzen या स्टार्टअप्सना प्रत्येकी 50 हजार अमेरिकन डॉलर्सचे अनुदान देत आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या मातृभाषेत माहिती, आरोग्य सल्ला आणि सरकारी सेवा सहज मिळू शकणार आहेत.

असा होणार फायदा?

शेती आणि आरोग्य क्षेत्रासाठी गुगलने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाधवानी एआय या संस्थेला 4.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत देण्यात येणार असून, या निधीतून बहुभाषिक एआय आधारित अ‍ॅप्लिकेशन्स तयार केली जातील. या अ‍ॅप्समुळे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज, रोग नियंत्रण याबाबत अचूक माहिती मिळेल. एआयच्या वापरामुळे उत्पादन वाढीसही मदत होणार आहे.

आरोग्य क्षेत्रात गुगल एम्ससोबत काम करणार आहे. त्वचारोग आणि बाह्यरुग्ण उपचारांसाठी भारत-विशिष्ट एआय मॉडेल्स विकसित केली जाणार आहेत. तसेच आयआयएससीमधील संशोधक आणि डॉक्टरांसोबत मिळून क्लिनिकल वापरासाठी एआय तंत्रज्ञान कसे अधिक प्रभावी करता येईल, यावर संशोधन केले जाणार आहे.

Google Investment India
Parbhani News : परभणीतही युती फक्त शिंदेंच्या शिवसेनेशीच, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार!

भारतीय भाषांचा विकास आणि समावेशक एआयला चालना देण्यासाठी गुगलने आयआयटी मुंबई येथे भारतीय भाषा तंत्रज्ञान संशोधन केंद्रासाठी 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे प्रारंभिक योगदान जाहीर केले आहे. भारतातील भाषिक विविधतेनुसार तंत्रज्ञान विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com