Parbhani News : परभणीतही युती फक्त शिंदेंच्या शिवसेनेशीच, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार!

Parbhani Mahayuti latest update : परभणीतील राजकीय घडामोडी: युती फक्त शिंदे गटाच्या शिवसेनेशीच, तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार.
Eknath Shinde-Ajit Pawar
Eknath Shinde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

शिवाजी वाघमारे

Municipal Corporation News : परभणी महानगरपालिका निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युती होणार असल्याचे स्पष्ट झाले असून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) मात्र स्वतंत्र निवडणूकीत उतरणार आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना राज्य पातळीवरुन आघाडी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून स्थानिक पातळीवर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिका निवडणूकीसाठी राज्यात सत्तेत असलेल्या महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसापासून युती व आघाडीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये राज्यातील अनेक महापालिकांमध्ये युती करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मात्र युतीतील तिसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस बाबत मात्र भाजप-शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतल्याचे दिसून आले. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे.

सर्वच पक्षांनी सुरुवाताली स्वबळाचा नारा दिला होता. परंतु या पक्षांना युती व आघाडी केल्याशिवाय पर्याय नसतांना निर्णय मात्र होत नव्हता. अपवाद वगळता सर्व प्रभागात इलेक्टींग मेरीटचे उमेदवार तर नव्हतेच परंतु अनेक पक्षांकडे उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांची देखील वानवा होती. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांची युती व आघाडीबाबतची भुमिका देखील सकारात्मकच होती. परंतु श्रेष्ठींच्या निर्णयाची सर्वांना प्रतिक्षा होती. आता सर्वच पक्षांच्या श्रेष्ठींनी युती व आघाडी करण्याचे संकेत दिल्यामुळे येत्या एक-दोन दिवसात युती व आघाडीच्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde-Ajit Pawar
Rajiv Satav Resignation story : राहुल गांधींसाठी राजीव सातवांनी एका मिनिटांत सोडली होती खासदारकी... त्यांच्याच पत्नीने आता काँग्रेस सोडली!

आमची निवडणुकीसाठी पूर्ण तयारी झाली असून आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. वरिष्ठ नेत्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही शिवसेनेसह युतीबाबत सकारात्मक चर्चा करणार आहोत. महायुतीच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटले आहे.

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मोठ्या संख्येने इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. एक जागेसाठी दहा उमेदवार होते. परंतु वरीष्ठपातळीवरील निर्देशाप्रमाणे महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर आम्ही आघाडी करण्याची तयार करीत आहोत. एक-दोन दिवसात बैठक होईल. परंतु आगामी महापौर हा महाविकास आघाडीचा राहील हे निश्चित, असा दावा शिवसेनेचे आमदार डाॅ. राहुल पाटील यांनी केला आहे.

Eknath Shinde-Ajit Pawar
Pradnya Satav : 'हात' सोडून 'कमळ' हातात! काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांचा असा आहे राजकीय प्रवास!

महापालिका निवडणूकीची पक्षाने जोरदार तयारी सुरु केली होती. दोनशेवर उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या होत्या. परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याच्या सूचना वरीष्ठ पातळीवरुन आल्या आहेत. लवकरच दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन सुत्र निश्चित करु. त्यामुळे भाजपा-शिवसेना युती या निवडणूकीत उतरणार आणि जिंकणार, असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी केला आहे.

आघाडीसाठी मुंबईत बैठक

मुबंईत बुधवारी (ता.17) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर महापालिका निवडणूकी संदर्भात बैठक झाली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर आघाडी करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आघाडातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळींची लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com