Chirag paswan : चिराग पासवान झाले मोदींचे हनुमान, बिहारमध्ये यश मिळवत ठरले एनडीएचे तारणहार

Chirag Paswan Savior NDA Narendra Modi :लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचा मुद्दा केंद्रस्थानी होता. या मुद्यावर राहुल गांधी, तेजस्वी यादव आक्रमक झाले होते. मात्र, चिराग पासवान हे आरक्षण आणि संविधानाला धोका नसल्याचे स्पष्टीकरण देत होते.
Chirag Paswan Narendra Modi
Chirag Paswan Narendra Modi sarkarnama

Chirag Paswan : लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचा मुद्दा काँग्रेसने केंद्रस्थानी आणला. या मुद्यावर भाजपची पिछेहाट झाली. युपीमध्ये भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र, बिहारमध्ये दलितांची संख्या सर्वाधिक असताना चिराग पासवान यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपला यश मिळाले. बिहारमध्ये जर इंडिया आघाडीला यश मिळाले असते तर राष्ट्रीयस्तरावर वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले असते. मात्र, बिहारमध्ये यश मिळवत चिराग पासवान हे एनडीएचे तारणार बनले आहेत.

जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत संविधानाला बदलू देणार नाही, असा प्रचार करत चिराग पासवान भाजपसोबत राहिले. त्यांच्या लोक जनशक्ती पार्टीला पाच पैकी पाच जागा मिळाल्या शिवाय भाजपच्या जागा निवडून आणण्यामध्ये चिराग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे एनडीएमध्ये नरेंद्र मोदी यांचे हनुमान म्हणूनच चिराग पासवान यांच्याकडे पाहिले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी Rahul Gandi आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये प्रचाराचा धडाका लावला होता. संविधान बदलाच्या मुद्दावर राहुल गांधी, तेजस्वी यादव आक्रमक झाले होते. तेजस्वी यांच्या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत होता. नितीश कुमार यांच्या सारख्या आघाड्या बदलण्याच्या मुद्यावर देखील त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएसाठी आश्वासक चेहरा चिराग पासवान ठरले.

काकांसोबत संघर्ष

चिराग पासवान Chirag paswan यांच्या हातातून पक्ष गेला होता. पक्षात फूट पाडून त्यांच्या काकाने पशुपती पार यांनी केंद्रीय मंत्रिपद मिळवले होते. रामविलास पासवान यांचा दिल्लीत असणाऱ्या बंगल्यातून देखील चिराग यांना बाहेर पडावे लागले होते. मात्र, हार न मानता चिराग यांनी पुन्हा सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचे उमेदवारांना पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावून आपले उपद्रव्यमूल्य दाखवून दिले.

राहुल-तेजस्वीला जोरदार उत्तर

लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचा मुद्दा केंद्रस्थानी होता. या मुद्यावर राहुल गांधी, तेजस्वी यादव आक्रमक झाले होते. मात्र, बिहारमध्ये ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये चिराग पासवान आरक्षण आणि संविधानाला धोका नसल्याचे स्पष्टीकरण देत होते. संविधान वाचवण्याच्या राहुल आणि तेजस्वीच्या बोलण्याला चिराग उत्तर देत होते. चिराग पासवन असे पर्यंत संविधानाला धोका नाही, हे ठासून सांगत होते. प्रचारामध्ये एकहाती मोर्चा संभाळत त्यांनी बिहारमध्ये त्यांच्या पक्षाला 100 टक्के यश मिळवून दिले.

भाजपसोबत दलित चेहरा

भाजपहा दलित विरोध असल्याच्या प्रचाराला काँग्रेस, विरोधीपक्षांकडून करण्यात येतो आहे. मात्र, या प्रचाराला उत्तर देण्यासाठी चिराग पासवान यांच्या रुपाने एनडीएमध्ये तरुण, आक्रमक चेहरा आहे. आगामी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान भाजपसोबत असणे त्यांना फायद्याचेच ठरणार आहे. तसेच केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने चिराग यांना देखील आपल्या पक्षाचा विस्तार करण्यास मदत होणार आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com