...तर अशोक पवार राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील : एकनाथ खडसेंची भविष्यवाणी

खडसेंनी शिरुर-हवेली मतदार संघ भाग्यवान असल्याचे नमूद केले.
Ashok Pawar-Eknath Khadse
Ashok Pawar-Eknath Khadsesarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज (ता. ५ फेब्रुवारी) शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या कार्यपद्धतीवर भलतेच खूष दिसले. साधारण निम्मा दिवस शिरूर तालुक्यातील विविध कार्यक्रमात पवारांच्या सोबत राहिलेल्या खडसेंनी पवार दांपत्याच्या कामाची पद्धत पाहिली आणि ‘मोठ्या साहेबांनी ठरवलं, तर अशोक पवार राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील. किसके नशीब का क्या बोले...! अशी भविष्यवाणी जाहीरपणे केली. खडसे यांच्या या वक्तव्याची क्लिप सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आमदार पवार समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. (If Sharad Pawar decides, Ashok Pawar will be the Minister : Eknath Khadse)

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या सुधारीत युनिटच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने एकनाथ खडसे आज शिरुर दौऱ्यावर आले होते. त्यांनी शिक्रापूर, शिरुर तसेच तालुक्यातील काही भागांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत आमदार अशोक पवार स्वत: होते. पहिल्या कार्यक्रमाच्या दरम्यान अशोक पवार यांच्या राजकीय यशाच्या सूत्रधार जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांच्याशी अनौपचारीक गप्पा मारुन पवार यांच्या कामकाजाची पद्धत त्यांनी जाणून घेतली.

Ashok Pawar-Eknath Khadse
भाजपचे शहराध्यक्ष मुळीकांना राष्ट्रवादीच्या जगताप-टिंगरेंचा मतदारसंघातच दणका!

विशेष म्हणजे शिक्रापूरच्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात त्यांनी सुजाता पवार यांच्याकडूनच पवार यांच्या कामकाजाची, प्रश्नांना भिडण्याची, ती सोडविण्याच्या पद्धतीची माहिती घेतली. त्या सर्व मुद्द्यांचा समावेश करीत त्यांनी आपल्या सर्व भावना कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केल्या.

Ashok Pawar-Eknath Khadse
काकडे गटाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात; भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीलाही धक्के बसणार

दरम्यान, आमदार अशोक पवारांच्या साखर कारखानदारीतील अभ्यासाबद्दल बोलताना त्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दलही काळजी घेण्याची बाब प्रकर्षाने स्पष्ट केली. विशेष म्हणजे आमदारांकडून इतर मतदार संघात कामांबाबतच्या अपेक्षाच जास्त व्यक्त होतात. शिरूर-हवेलीत मात्र केलेल्या कामांबद्दल कार्यकर्ते बोलत असल्याचा चांगला अनुभव आल्याचेही खडसे यांनी सांगितले.

Ashok Pawar-Eknath Khadse
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आपल्या संवादाचा शेवट करताना खडसे म्हणाले की, एवढे उत्तम काम करणाऱ्या आमदार पवारांबाबत मोठ्या साहेबांनी ठरवलं, तर ते राज्याच्या मंत्रिमंडळात दिसल्यास वावगे वाटू नये, किसके नशीबा का क्या बोले...! असे म्हणत खडसेंनी शिरुर-हवेली मतदार संघ भाग्यवान असल्याचे नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com