ZP Election : मंत्री जयकुमार गोरेंच्या कट्टर विरोधकाने शड्डू ठोकलाच : भावाला ZP वर पाठवण्यासाठी लागणार वेगळी 'स्ट्रॅटेजी'

ZP elections Maharashtra : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुकुडवाड हा गट आमचा हक्काचा असून या गटातून 'देसाई' आडवानाचा उमेदवार लढणारच.
ZP Election : मंत्री जयकुमार गोरेंच्या कट्टर विरोधकाने शड्डू ठोकलाच : भावाला ZP वर पाठवण्यासाठी लागणार वेगळी 'स्ट्रॅटेजी'
Published on
Updated on

Satara ZP Politics : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुकुडवाड हा गट आमचा हक्काचा असून या गटातून 'देसाई' आडवानाचा उमेदवार लढणारच, मग तो अनिल देसाई वा महेंद्र देसाई वा आणखी कोणी देसाई असेल, असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी व्यक्त केला. ते दहिवडी येथे माध्यमांशी बोलत होते. देसाई हे मंत्री जयकुमार गोरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

अनिल देसाई म्हणाले, कुकुडवाड गटाचे आरक्षण खुले व्हावे अन् तिथून मी निवडणूक लढवावी यासाठी गेली वीस वर्षे मी वाट बघत होतो. त्यामुळे यंदा या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मधून देसाई आडनावाचा उमेदवार उभा राहणारच मग तो अनिल देसाई वा महेंद्र देसाई वा आणखी कोणी देसाई असेल. देसाई यांच्या या भूमिकेमुळे कुकुडवाड गटात तिरंगी लढत होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

कुकुडवाड एकमेव गट खुला :

माण तालुक्यातील पाचपैकी गोंदवले बुद्रुक हा गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. आंधळी, बिदाल आणि मार्डी हे गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. केवळ कुकुडवाड गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

ZP Election : मंत्री जयकुमार गोरेंच्या कट्टर विरोधकाने शड्डू ठोकलाच : भावाला ZP वर पाठवण्यासाठी लागणार वेगळी 'स्ट्रॅटेजी'
India US Trade Deal : भारत-अमेरिका डील फायनल? टॅरिफ 50 वरून थेट 15% ट्र्म्पकडून मोठं गिफ्ट!

या गटात सातारा जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई हे मातब्बर आहेत. त्यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते कट्टर गोरे विरोधक म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे, उद्योजक अभयसिंह जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बडे नेते याच गटात आहेत.

ZP Election : मंत्री जयकुमार गोरेंच्या कट्टर विरोधकाने शड्डू ठोकलाच : भावाला ZP वर पाठवण्यासाठी लागणार वेगळी 'स्ट्रॅटेजी'
Udaysingh Patil-Undalkar : उंडाळकरांच्या साम्राज्याला भेदण्यासाठी मोठा डाव : शरद पवारांचा निष्ठावंत शिलेदार अन् भाजप आमदार एकत्र येणार?

पवारांच्या दोन चेल्यांशिवाय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे ऐनवेळी भाजपकडून अरुण गोरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतात. कुकुडवाडमधून देसाई आणि जगताप यांच्यासोबत अरुण गोरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास इथे 'हाय व्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com