
Kolhapur Election and Interested Candidates : कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत जिल्हा पंचायत समितीची मुदत संपल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार राहिलेल्या इच्छुकांना निवडणुकांची केवळ प्रतीक्षाच लागून राहिली आहे. चार वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग अजूनही खडतर आहे.
25 फेब्रुवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत निर्णय होणार असला तरी गेल्या चार वर्षांपासून इच्छुकांच्या राजकीय नेतृत्वावर गदा आली आहे. इतकेच नव्हे तर निवडणूक अनुषंगाने तयारी करत असताना गेल्या चार वर्षांपासून तारीख ते तारीख मिळत असल्याने कार्यकर्ते टिकून ठेवण्यासाठी खिसे रिकामे होत आहेत. त्यामुळे इच्छुकांना राजकारण करण्यासाठी उसनवारी करावी लागत आहे.
कोल्हापूर(Kolhapur) इचलकरंजी महानगरपालिकेसह कोल्हापूर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समितीवरील अशा एकूण जिल्ह्यातील ६१५ जागांवरील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक रखडल्याने यामध्ये इच्छुक कर्जाच्या खाईत लोटले जात आहेत. गेल्या चार वर्षांपासून या निवडणुका रखडल्या जात असल्याने इच्छुकांच्या खर्चात भर पडत आहे. सातत्याने येणारे सण उत्सव आणि सार्वजनिक तरुण मंडळाच्या खर्चाचा बोजा अशा इच्छुकांवर पडत आहे.
वास्तविक राजकीय नेतृत्व टिकवण्यासाठी अशा सार्वजनिक तरुण मंडळाचे लाड याच राजकीय पुढाऱ्यांकडून होत असतात. त्यामुळे गणेशउत्सव, शिवजयंती, यासह धार्मिक उत्सवावर वर्गणी गोळा करण्यासाठी इच्छुकांवर दबाव आणला जात आहे. मात्र कार्यकर्ता नाराज न होण्याची काळजी याच इच्छुकांनी घेतलेली दिसते.
वर्गणी स्वरूपात अशा कार्यकर्त्यांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी 1000 पासून ते दोन- तीन लाखांपर्यंतची वर्गणी अशा इच्छुक लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांच्या झोळीत टाकली आहे. मात्र चार वर्षांपासून वर्षानुवर्षे हीच स्थिती असल्याने अशा इच्छुक लोकप्रतिनिधींची तिजोरी रिकामी झाली आहे. आज ना उद्या स्थानिक स्वराज्य निवडणूक लागण्याची घोषणा होईल या आशेवर लोकप्रतिनिधी तयार आहेत. काहींनी निवडणूक घोषणा झाल्यानंतरच तयारीची रणनीती आखली आहे. पण कार्यकर्ता दुरावण्याची भीती त्यांच्यासमोर आहे. पण खबरदारी म्हणून काहींनी आपले स्नेहबंध कायम जपले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.