Lok Sabha Election 2024 :...तर उमेदवारांना पळता भुई, थोडी होईल; घामही फुटेल!

Lok Sabha Election 2024 News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गावोगावी जाणाऱ्या उमेदवारांना नक्कीच घाम फुटणार आहे.
pilitical leader Representative photo
pilitical leader Representative photosarkaranama

नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच दुष्काळसृदृश परिस्थितीची भर पडली आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत. बेरोजगारी, महागाईच्या समस्यांची झळ सर्वांनाच बसत आहे. मार्चमध्येच अनेक भागांत तापमान 40 अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांना यामुळे नक्कीच घाम फुटणार आहे.

यंदा ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जनावरांच्या कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. काही भागांत कडब्याच्या 100 पेंढ्यांसाठी 1000 ते 1500 रुपये मोजावे लागत आहेत. पशुपालन, दुग्धव्यवसाय करणाऱ्यांना या महागाईचा फटका बसत आहे. दूध देणाऱ्या गायी, म्हशींसाठी लागणाऱ्या चंदीचे (मक्याचा भरडा, पेंड आदी) भाव आधी 900 रुपये होते, ते आता 1400 रुपयांपर्यंत गेले आहेत, असे शेतकरी सांगतात. हिरवा चारा नसेल तर गायी, म्हशी, बैलांना दररोज सात-आठ पेंढ्या कडबा लागतो. शिवाय चंदी लागते ती वेगळीच. इकडे दर वाढत असताना दुधाच्या शासकीय खरेदीच्या दरात मात्र फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे पशुपालक हैराण झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या आहेत लोकांच्या, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या. याच्या जोडीला धान्याचे पडलेले खरेदी दरही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहेत. सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. ऊस हे हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक आहे, मात्र त्यासाठी पाणी अधिक लागते आणि सध्या पाणीटंचाई आहे. ऊस कारखान्याला घालवण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी कसरत वेगळीच असते. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनाही शेतकऱ्यांच्या या समस्यांचा गांभीर्याने विचार केला असेल का, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक मतदारसंघांत अद्याप उमेदवार निश्चित झालेले नाहीत. प्रत्येक पक्षाचा अजेंडा ठरला आहे, प्रचार कोणत्या मुद्द्यावर करायचा, हे निश्चित झालेले आहे. यात शेतकऱ्यांचे मुद्दे कोणता पक्ष उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीचा प्रचार या आणि अशा खऱ्या मुद्द्यांऐवजी ध्रुवीकरण करणाऱ्या मुद्द्यांवर जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर शेतकऱ्यांचे, सामान्य लोकांचे मुद्दे पुन्हा बाजूला पडण्याचा धोका आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता असेच होण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे.

pilitical leader Representative photo
Lok Sabha Election 2024 : उमेदवारीची औपचारिकता पूर्ण, आता ओमराजेंना प्रतीक्षा महायुतीच्या पैलवानाची

मार्चमध्येच वातावरण प्रचंड तापू लागले आहे, कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. सर्व पक्षांचे उमेदवार निश्चित झाले की, प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचणार आहे. आरोप-प्रत्यारोपांचा धडाका सुरू होणार आहे. ही सर्व कामे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कडाक्याच्या उन्हात करावी लागणार आहेत. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात दिवसभर फिरताना उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांना कसरत करावी लागणार आहे. ही झाली वातावरणातील धग. लोकांनी जर उमेदवारांना कामाचे प्रश्न विचारायला सुरुवात केली, तर ही धग आणखी वाढणार आहे. उमेदवारांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ येणार आहे. आभासी, ध्रुवीकरणाचे मुद्दे सोडून लोकांनी जर खऱ्या मुद्द्यांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर सर्वच पक्षांच्या उमेदवारांना पळता भुई थोडी होणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

pilitical leader Representative photo
Lok Sabha 2024 : मतदारांचा कल जाणण्यासाठी भाजपची रुग्णालयापर्यंत उडी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com