Lok Sabha Election 2024 : भुमरे, जलील अन् खैरेंमध्ये तिरंगी लढत; 'हे' मतदार ठरवणार संभाजीनगरचा खासदार

Chhatrapati Sambhajinagar Constituency : गेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघात 19 लाख 75 हजार एवढे मतदार होते. यापैकी 60% मतदान झाले.
sandipan bhumare chandrakant khaire Imtiyaz Jaleel
sandipan bhumare chandrakant khaire Imtiyaz Jaleelsarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 37 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यात महायुतीचे ( Mahayuti ) संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) चंद्रकांत खैरे, 'एमआयएम'चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान व अपक्ष हर्षवर्धन जाधव ( Harshvardhan jadhav ) या प्रमुख पाच उमेदवारांचा समावेश आहे.

मुख्य लढत भुमरे-खैरे आणि इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ), अशी तिरंगी होणार आहे. राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा टोकाचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील ( Sambhajinagar Lok Sabha Constituency ) वीस लाख 61 हजार 220 मतदारांपैकी सर्वाधिक संख्या असलेल्या साडेसहा लाख ओबीसी मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांची भिस्त असणार आहे. याशिवाय यंदा एक लाख नवे मतदार वाढले आहेत. या नवमतदारांचा कल कोणाच्या बाजूने असेल? यावरच संभाजीनगर लोकसभेचा खासदार कोण? असेल हे निश्चित होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसींच्या खालोखाल तब्बल सहा लाख मतदार हे खुल्या प्रवर्गातील असून, साडेतीन लाख अल्पसंख्याकांची मते निर्णायक ठरणार आहेत. अनुसूचित जातीचे अडीच लाख तर अनुसूचित जमातीचे एक लाख असे साडेतीन लाख मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 37 पैकी आठ उमेदवार हे मराठा असून प्रत्येकी पाच उमेदवार ओबीसी आणि मुस्लिम समाजातून लढत आहेत.

याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचे मिळून असे एकोणावीस अनुसूचित जातीचे उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होणार असल्याने कोणता उमेदवार विजयी होईल? हे आज तरी निश्चितपणे सांगता येत नाही. प्रमुख लढत ही तिरंगी असणार, एवढे मात्र स्पष्ट आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी तीन लाख 89 हजार मते घेत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांच्यावर साडेचार हजार मतांनी विजय मिळवला होता. यावेळी एक लाख मतदार वाढलेले असल्यामुळे जो उमेदवार चार लाख मतांचा टप्पा गाठू शकेल, तोच संभाजीनगरचा खासदार होईल हे स्पष्ट आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघात 19 लाख 75 हजार एवढे मतदार होते. यापैकी 60% मतदान झाले. त्यामुळे अटीतटीच्या झालेल्या लढतीत 'एमआयएम'ने मतविभाजनाच्या जोरावर विजयाला गवसणी घातली होती. गेल्यावेळी साडेचार हजार मतांनी पराभूत झालेले चंद्रकांत खैरे या वेळी विजयाची मशाल पेटवतात का? की राज्यातील सत्ता आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महायुतीचे संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांच्या पथ्यावर पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

sandipan bhumare chandrakant khaire Imtiyaz Jaleel
VBA News : वंचित आघाडीने संभाजीनगरात एमआयएमला बनवले 'मामू'...

इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम उमेदवार दिल्याचा फटका बसू शकतो असे बोलले जाते. परंतु, खैरे आणि भुमरे यांच्यामधील मत विभाजनाचा फायदा पुन्हा आपल्याला होऊ शकतो आणि दुसऱ्यांदा विजय मिळू शकतो, असा विश्वास 'एमआयएम'चे समर्थक व्यक्त करत आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

sandipan bhumare chandrakant khaire Imtiyaz Jaleel
AIMIM News : संभाजीनगरची सीट धोक्यात, तरी इम्तियाज जलील छोटे भाई आनंदराज यांच्या मदतीला…

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com