Raebareli lok sabha Election : गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला अभेद्य राहणार? कशी आहेत राजकीय गणिते?

Soniya Gandhi News : 2004 पासून सोनिया गांधी यांनी या मतदारसंघात नेतृत्व केलं आहे.
priyanka gandhi | rahul gandhi | soniya gandhi
priyanka gandhi | rahul gandhi | soniya gandhisarkarnama

New Delhi, 18 May : सगळ्या देशाचं लक्ष रायबरेली मतदारसंघाकडे ( Raebareli lok sabha Election ) लागलं होतं. गांधी कुटुंबातील तीन पिढ्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. आता चौथी पिढी पुन्हा रायबरेली मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेली आहे. या मतदारसंघात राहुल गांधी यांना घेरण्यासाठी भाजपनं ( Bjp ) मोठी फौज उतरवली आहे. त्यामुळे रायबरेलीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

फिरोज गांधी, इंदिरा गांधी ( Indira Gandhi ) आणि सोनिया गांधी ( Soniya Gandhi ) यांनी रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेत केलं आहे. पण, 1977 मध्ये इंदिरा गांधी यांच्या पराभवाचा अपवाद वगळता या मतदारसंघावर गांधी कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे. आता येथून राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आपलं नशीब अजमावत आहेत. रायबरेली गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला, तरी येथील काँग्रेसची संघटना कमजोर झाली आहे. रायबरेलीच्या अंतर्गत पाच विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील चार मतदारसंघ समाजवादी पक्षाच्या ताब्यात आहेत, तर एका ठिकाणी भाजपचा आमदार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2004 पासून सोनिया गांधी यांनी या मतदारसंघात नेतृत्व केलं आहे. रेल कोच फॅक्टरी, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नॅशनल हायवे अशा सुधारणा या मतदारसंघात झाल्या आहेत. तरी, या मतदारसंघातील मतदारांची साक्षरता केवळ 57 टक्के एवढीच आहे. आता राहुल गांधी यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने हा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे.

प्रियांका गांधी रायबरेली या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. भाजपने ही या मतदारसंघात विजय संपादन करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले दिनेश प्रताप सिंह यांना भाजपने येथून राहुल गांधी यांच्याविरोधात रिंगणात उतरविले आहे. गेल्या निवडणुकीत सोनिया गांधी यांना त्यांनीच जोरदार लढत दिली होती. भाजपचे मताधिक्य 17 टक्क्यांनी वाढविण्यात दिनेश प्रताप सिंह यांना यश आले होते. दिनेश प्रताप सिंह हे 2018 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि उत्तर प्रदेश विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला चांगलेच यश मिळवून दिले होते.

यंदा भाजपचे 25 ते 30 नेते रायबरेलीत तळ ठोकून आहेत. प्रत्येक समाजाच्या नेत्यांना पक्षानं जबाबदारी दिली आहे. रायबरेलीत दलित समाजाची 30 टक्के, तर मुस्लिम समाजाची 12 टक्के मते आहेत. हीच मते या मतदारसंघात निर्णायक राहिली आहेत. 2019 मध्ये बहुजन समाज पक्षानं ( बसप ) सोनिया गांधी यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. पण, यंदा ठाकूर प्रसाद यादव यांना उमेदवारी काँग्रेसच्या अडचणीत भर घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदारांना काँग्रेसकडे ओढण्यासाठी प्रियंका गांधी यांनी रायबरेलीत तळ ठोकला आहे. दलित आणि मुस्लिम समाजाची मतेच मताधिक्य ठरविणार असल्याचं सध्याचं चित्र आहे.

priyanka gandhi | rahul gandhi | soniya gandhi
Congress Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचं 13 राज्यांत 'एकटा जीव सदाशिव!'

एकूण मतदार - 18 लाख

2019 मधील निवडणुकीचा निकाल

सोनिया गांधी (काँग्रेस) - 5,34,918 (55.80 टक्के)

दिनेश प्रताप सिंग (भाजप) - 3,67,740 (38.36 टक्के)

वर्चस्व -

2014 - काँग्रेस

2009 - काँग्रेस

( Edited By : Akshay Sabale )

priyanka gandhi | rahul gandhi | soniya gandhi
Modi Cabinet Meeting : मोदींच्या कॅबिनेट बैठका कशा होतात? गडकरींच्या ‘त्या’ किश्श्यासह माजी मंत्र्याने सांगितली इनसाईट स्टोरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com