Political News Elections in History : निवडणुका आल्या की सगेसोयरेही म्हणतात 'हम आपके है कौन?'

Political News : लोकसभेच्या आगामी निवडणुकांत काही ठिकाणी नात्यांत लढती होत आहेत. यापूर्वीही अशा निवडणुका झाल्या होत्या. नातलग मंडळी एकमेकांविरोधात उभी टाकल्याने या निवडणुका चुरशीच्या ठरल्या होत्या. यामध्ये भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहिणी- बहिणी, चुलते-पुतणे, दीर-भावजय यांच्यात लढती पाहावयास मिळाल्या.
Political News - नात्यातल्या लढती
Political News - नात्यातल्या लढतीSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने सर्वांचे लक्ष आगामी काळात कशा लढती होणार याकडे लागले आहे. त्यामध्ये काही ठिकाणी भाऊबंदकी एकमेकांविरोधात उभी ठाकणार आहे. महायुती व महाविकास आघाडीत राज्यात होणारी ही लोकसभेची निवडणूक Lok Sabha Election रंगतदार ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील नातेवाइकांच्या या चुरशीच्या लढतीमध्ये बाजी कोण मारणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजप-शिवसेनेची 25 वर्षांपासून असलेली युती Alliance तुटली तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress यांच्यातील आघाडी तुटल्याने सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले होते. त्यामुळे नातलग मंडळी एकमेकांविरोधात उभी टाकल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती. यामध्ये भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहिणी- बहिणी, चुलते-पुतणे, दीर-भावजय यांच्यात रंगतदार लढती Fights झालेल्या पाहवयास मिळाल्या. Lok Sabha Election Contest in relations held in Maharashtra in past

बहीण-भाऊ लढतीत बहिणीची बाजी

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात पहिल्यांदच मुंडे बहीण-भावात लढत झाली. भाजपच्या आमदार पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्याविरुद्ध त्यांचे चुलतभाऊ तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे रिंगणात उतरले होते. त्यामुळे ही बहीण-भावातील लढत रंगतदार ठरली. यापूर्वी या मतदारसंघातून आमदार पंकजा मुंडे 25 हजार 895 मताने विजयी झाल्या होत्या. या वेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून NCP धनंजय मुंडे Dhananjay Munde त्यांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी बाजी मारीत विजय मिळवला होता. त्यानंतर त्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी झाल्या होत्या.

भावा-भावातच लढत

उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेकडून Shiv Sena विद्यमान आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील दुसऱ्यांदा मैदानात उतरले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह यांचा ओमराजे निंबाळकर यांनी पराभव केला होता. मात्र, 2014 च्या या निवडणुकीत ओमराजेंचा पराभव करीत राणा जगजितसिंह पाटील यांनी 10 हजार 806 मताने विजय मिळवत पराभवाचा वचपा काढला होता.

हेदेखील वाचा -

Political News - नात्यातल्या लढती
Supriya Sule News : सुळेंचा थेट दादांच्या आमदाराला 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचा इशारा; नेमकं काय म्हणाल्या?

पुतण्याने केले चुलत्याला पराभूत

लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याविरुद्ध त्यांचे चुलते तथा काँग्रेसचे नेते अशोक पाटील-निलंगेकर नशीब आजमावत होते. यापूर्वी झालेल्या आजोबा-नातू यांच्या लढतीत 2004 मध्ये नातू संभाजी पाटील यांनी आजोबांना पराभूत केले होते, तर 2009 मध्ये झालेल्या लढतीत आजोबा-तथा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी नातवाचा पराभव केला होता. या वेळी शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी चिरंजीव अशोक पाटील-निलंगेकरांना संधी दिली होती. या लढतीत संभाजी पाटील यांनी चुलते अशोक पाटील यांचा 27,511 मताने पराभव केला होता. पुढे फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री झाले होते.

दिराने केला भावजयीचा पराभव

लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसने त्रिंबक भिसे यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरुद्ध भावजय तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आशा भिसे या मैदानात उतरल्या होत्या. या मतदारसंघातून दीर-भावजय पहिल्यांदाच नशीब आजमावत होते. या लढतीत त्रिंबक भिसे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता .

दोन भगिनीतील लढत

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध त्यांची बहीण संयोगिता निंबाळकर अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत ठाकूर यांच्या प्रचारासाठी निंबाळकर यांनी सहकार्य केले होते. मात्र, या वेळी होत असलेल्या बहिणी-बहिणीच्या या लढतीत यशोमती ठाकूर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

पुतण्याने मारली बाजी

काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात त्यांचे पुतणे तथा भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांच्यात लढत झाली. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत अनिल देशमुख या ठिकाणाहून विजयी झाले होते. हा मतदारसंघ आशिषचे वडील, माजी मंत्री रणजित देशमुख यांचा मतदारसंघ आहे. या निवडणुकीत पुतण्या आशिष देशमुखांनी बाजी मारत चुलते अनिल देशमुख यांचा 5 हजार 557 मताने धूळ चारली.

दीर, भावजयीचा झाला पराभव

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघातून डॉ. आसावरी देवतळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. त्यांचे दीर तथा माजी मंत्री संजय देवतळे यांनी बंडखोरी करून भाजपकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये संजय देवतळे यांचा शिवसेनेच्या बाळू धानोरकर यांनी दोन हजार मताने पराभव केला होता. या लढतीत दीर व भावजयीला पराभव स्वीकारावा लागला होता.

R

Political News - नात्यातल्या लढती
Pankaja Munde: माझं तिकीट राज्यानं नव्हे देशानं ठरवलं; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com